Arun Dongle .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif News: हसन मुश्रीफांनी बाजी पलटवली; शिवसेनेच्या जवळ गेलेल्या गोकुळच्या माजी अध्यक्षांना राष्ट्रवादीत आणलं

Arun Dongale NCP Join : पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत गोकुळ मधील ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडिक गटाची साथ सोडली. पण आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरुण डोंगळे यांची उपस्थिती कधी शिवसेनेच्या स्टेजवर तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर पाहायला मिळत होते. काही महिन्यांपूर्वी डोंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिक जवळचे झाल्याचे आणि ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा झडत होती. अखेर मंगळवारी(ता.23) डोंगळे यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रचाराच्या माध्यमातून गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. हळूहळू शिवसेनेतील संपर्क वाढत गेला.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आभार मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत अरुण डोंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सातत्याने संपर्क वाढल्याने डोंगळे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या पुत्राला राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांना उमेदवारी देण्याची अट मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ठेवून राजीनामा दिला होता.

पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत गोकुळ मधील ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडिक गटाची साथ सोडली. पण आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली आहेत.

महायुतीमधील राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेचे सर्वच आमदार पदाधिकारी गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून उतरणार आहेत. अशातच मंत्री मुश्रीफ यांच्याकडे या निवडणुकीतील नेतृत्व गेले आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघात देखील मंत्री हसन मुश्रीफ यांची ताकद वाढली आहे.

अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असताना जिल्हा परिषद निवडणुकीत चिरंजीव अभिषेक डोंगळे यांना उमेदवारी देण्याचा शब्द मंत्री मुश्रीफ यांच्याकडून घेतला होता. पण आता डोंगरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राधानगरी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT