Gokul Government Directors sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Government Directors : 'गोकुळ'मध्ये शासन नियुक्त सदस्यांची नावे जाहीर, सतेज पाटलांचा दावा खरा ठरला!

Government Appoints Directors : गोकुळवर शासन नियुक्त सदस्यांची नावे समोर आली आहेत. गोकुळमध्ये महायुतीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेनेकडे आहेत. मात्र, अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार असल्याची चर्चा आहे.

Roshan More

Gokul News : गोकुळ अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीला सोपी जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच शासन नियु्क्त सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

गोकुळमध्ये शासन नियुक्त सदस्यमधून प्रकाश पाटोळे,डॉ. प्रवीण हेंद्रे, के. डी. पाटील आणि शिवाजीराव आडनाईक यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही नाव जाहीर करण्याच्या आधीच सतेज पाटलांनी आपल्या जाहीर सभेत हीच नावे घेत यांची नियुक्त होणार असल्याचे सांगितले होते.

अडनाईक हे यावलुज, पन्हाळ येथील आहेत. तर, डाॅ.हेंद्र हे हातकणंगले तालुक्यातील आहेत, कृष्णात पाटील कागलमधील आहेत. तर, पाटोळे हे सांगली जिल्ह्यातील आहेत. हे शासन नियु्क्त सदस्य आजच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद

गोकुळमध्ये महायुतीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेनेकडे आहेत. मात्र, अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार असल्याची चर्चा आहे. रणजीतसिंह पाटील हे राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार असणार आहेत. त्यांच्या नावावर महायुतीत एकमत असल्याची चर्चा आहे. तर, माजी आमदार राजेश पाटील यांचे देखील नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT