Gokul Dudhsang 2026 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul News : "अदृश्य शक्तीला महायुती पॅनेलमधून वगळा, दारातही उभं करायच नाही" : गोकुळमधील 1400 संस्थांचा ठराव, मेळाव्यात महाडिक सोडून सगळ्यांचे आभार

Gokul Milk Union: गोकुळ दूध संघातील पात्रता व पात्रतेचा वाद न्यायालयीन निकालानंतर संपला. १४०० दूध संस्थांनी कृतज्ञता मेळाव्यात अदृश्य शक्तीला पॅनेलमधून वगळण्याचा ठराव करत संतप्त भावना व्यक्त केल्या.

Rahul Gadkar

Gokul Milk Union: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या पात्र व अपात्रतेचा वाद संपल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास १४०० संस्थांना न्याय मिळाला. तब्बल चार ते पाच महिने सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक संस्थांना त्रास सहन करावा लागला. संस्था पात्र करत असताना प्रत्येक टप्प्यावर संस्था सभासदांना संघर्षाला सामोरे जावे लागत असल्याने

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या १४०० दूध संस्थांचा सत्यविजय कृतज्ञता मिळावा पार पडला. या मेळाव्यात प्रतिनिधींनी अदृश्य शक्तीला पॅनलमधून वगळा अशी जाहीर मागणी केली. तसेच सर्व नेत्यांचे आभार मानले पण यावेळी केवळ महाडिक गटातील एकाही नेत्याचं नाव घेतले नाही. त्यामुळे आगामी काळात या संस्थांचा महायुतीच्या पॅनलवर कसा परिणाम पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

'कृतज्ञता' मेळाव्यात १४०० संस्थांच्या प्रतिनिधींनी संतप्त भावना व्यक्त करत अदृश्य शक्तीला पॅनेलमधून वगळण्याचा ठराव केला आहे. 'त्या' अदृश्य शक्तीने खूप त्रास दिला आहे. त्यांना उंबरठ्यावरही उभं करून घ्यायचे नाही. नेत्यांनाही सांगायचे अदृश्य शक्ती वगळून पॅनेल झाले, तरच आम्ही तुमच्या सोबत नाही, अशा संतप्त भावना गोकुळ दूध संघातील १४०० संस्था प्रतिनिधींनी आज 'सत्यविजय' कृतज्ञता मेळाव्यात व्यक्त केल्या.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्याबरोबर गोकुळ मधील काही ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले. मात्र या संपूर्ण मेळाव्यात आभार मानत असताना महाडिक गटाचे नाव न आल्याने नेमकी अदृश्य शक्ती हीच का? अशी शंका उपस्थित होत आहे.

'गोकुळ'मधील १४०० संस्थांचा धैर्यशील मंगल कार्यालयात गुरुवारी दुपारी मेळावा झाला. ज्या संस्थांना स्वतःची संस्था वाचविण्यासाठी चार महिने झगडावे लागले, त्यांनी या कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते. येथे एकाही नेत्याला आमंत्रित केले नव्हते.

अनुप वागरे म्हणाले, 'गोकुळ'वर प्रशासक आल्यानंतर संस्थांना मतदानासाठी अपात्र ठरवायचे, संस्था अवसायनात काढण्यासाठी अदृश्य शक्ती कार्यरत होती. ही अदृश्य शक्ती कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना दारात उभा करू नका. त्यांनी संस्थांचा खेळ लावला होता, हे ध्यानात ठेवा.

उत्तम पाटील म्हणाले, अदृश्य शक्तीमुळे न्यायालयीन लढा लढावा लागला. साडेचारशे लिटर दूध असताना संस्था अवसायनात काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अदृश्य शक्ती सोडून पॅनेल झाले पाहिजे. अशोक पाटील यांनी शपथ घालत अदृश्य शक्तीच्या मागे जायचे नाही, असा निर्धार १४०० संस्थांचा झाला पाहिजे, असे सांगितले. सुनील पाटील यांनीही अदृश्य शक्तीच्या त्रासाची माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT