Gokul Chairman Election Case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Chairman Election Case : गोकुळ अध्यक्ष निवड प्रकरणी सर्किट बेंचचा महत्त्वाचा आदेश; शासन नियुक्तसह महायुतीच्या सर्व संचालकांना म्हणणे मांडावे लागणार

Kolhapur Bench Issues Notice to Gokul Mahayuti Directors : गोकुळ दूध संघातील चार शासन नियुक्त संचालक व अध्यक्ष निवडीबाबत आज झालेल्या सुनावणीत कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वाचा आदेश दिला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : गोकुळ दूध संघातील चार शासन नियुक्त संचालक व अध्यक्ष निवडीबाबत आज झालेल्या सुनावणीत ३ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले. तसेच शासन नियुक्त चार संचालकांसह महायुतीच्या सर्व संचालकांना नोटीस देऊन म्हणणे मांडण्यासाठी (हजर राहण्यासाठी) आदेश दिले आहेत. अध्यक्ष निवडीच्या सभेचे प्रोसीडिंग दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

आज झालेल्या सुनावणीत सर्व संचालकांना नोटीस बजावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. त्यावर आतापर्यंत महायुतीच्या आठ संचालकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती समविचारी आघाडीचे वकील अॅड. कुंभकोनी यांनी न्यायालयासमोर दिली. त्यावर न्यायालयाने महायुतीच्या सर्व संचालकांना विविध माध्यमांतून नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले नाही, तर पुढील सुनावणीवेळी आदेश काढण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.

दरम्यान, प्रत्यक्ष अध्यक्ष निवडीच्या वेळी तसेच चार शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीनंतर झालेल्या सभेचे प्रोसीडिंग दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली. समविचारी आघाडीकडून अॅड. श्रीकृष्ण गनबावले आणि अॅड. आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडली. तर महायुतीकडून अॅड. साखरे यांनी बाजू मांडली.

१० नोव्हेंबर रोजी गोकुळ दूध संघाची दुसरी सभा पार पडली. या सभेत राज्य सरकारकडून चार शासन नियुक्त संचालकांची निवड करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. समविचारी आघाडीकडे बहुमत असूनही त्यांना अध्यक्षपदापासून वंचित राहावे लागले. सभेच्या गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता होती. महायुतीकडेही १२ संचालक होते. त्यामुळे शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन १० नोव्हेंबरच्या सभेत महायुतीचे राजेश पाटील अध्यक्ष झाले.

तत्पूर्वी, राज्य सरकारच्या या आदेशाला समविचारी आघाडीकडून आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT