Gokul Election : कोल्हापूरचे आर्थिक केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढली जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस नेते सजेत पाटील यांच्याकडे असलेले संचालक आणि महायुतीत हसन मुश्रीफ यांच्याकडे असलेले संचालकांचे संख्याबळ बघता या दोघांमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य या पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत 25 वर्षांपासूनची महाडिक गटाची सत्ता उलथवून लावली. तत्कालीन सत्याधार्यांना केवळ 4 संचालक या निवडणुकीत विजयी करता आले होते. तर उर्वरित 17 जागांवर सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्या गटाने विजय मिळवला होता. मात्र 5 वर्षानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. लोकसभा, विधानसभासह जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
सध्याच्या राजकीय समीकरणानुसारसतेज पाटील यांच्याकडे अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगुले, चेतन नरके, बयाजी शेळके, प्रकाश पाटील हे संचालक आहेत. चेतन नरके यांनी महाडिक गटासोबत फारकात घेऊन गेल्या 4 वर्षांपासून पाटील यांच्या सोबतच आहेत. अभिजित तायशेटे हे जिल्हा परिषदेवर नुकतेच निवडून आले आहेत. त्यामुळे साहजिकच ते पाटील यांच्या सोबत राहतील. तर ए. वाय पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते देखील पाटील यांच्याकडे असणार आहे.
दुसऱ्या बाजूला अमरसिंह पाटील, अंजना रेडेकर हे गोकुळ मध्ये सतेज पाटील यांच्यासोबत असले तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अमरसिंह पाटील यांना जनसुराज्यने पाठिंबा दिला होता. तर रेडेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध रेडेकर हे जनसुराज्य पक्षाकडून जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे पाटील यांनीआणि रेडेकर यांची भूमिका येणारा काळ ठरवणार आहे.
महायुतीत हसन मुश्रीफ यांच्याकडे सर्वाधिक संचालक आहेत. त्यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ हे गोकुळवर अध्यक्ष आहेत. तर अरुण डोंगळे, किसन चौगुले, रणजित पाटील अशी राधानगरी तालुक्यातील ताकद मुश्रीफ यांच्याकडे आहे. शिवाय करणसिंह गायकवाड, नंदकुमार ढेंगे हे संचालकही सोबत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर बाळासो खाडे हे देखील मुश्रीफ यांच्या सोबत आहेत.
भाजपकडे केवळ दोनच संचालक आहेत. अंबरीश घाटगे आणि शोमिका महाडिक असे संख्याबळ आहे. तर शिवसेनेकडे संभाजी पाटील, अजित नरके, विश्वास पाटील, सुजित मिणचेकर हे 4 संचालक आहेत. नरके आणि पाटील हे प्रमुख संचलक गोकुळमधील सत्ता खेचण्यासाठी निर्णायक ठरतील. मात्र विश्वास पाटलांनी अजून गोकुळमधील भूमिका स्पष्ट केलेली नाही.
सध्या हे सर्व संचालक गोकुळमध्ये आपापल्या नेत्यासोबत असले तरी पुढील 2 महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे यातील काही संचालक आणखी काही निर्णय घेऊ शकतात. वास्तविक महायुतीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीत सतेज पाटील हेच गोकुळ मधील किंगमेकर पुन्हा ठरू शकतात, असे सध्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.