Satej Patil: 'गोकुळ'ला सतेज पाटील हलक्यात घेणार नाहीत! महापालिका, झेडपीत ताकद दाखवल्यानंतर आता हिसका देणार

Kolhapur District Milk Producers Cooperative Election: गोकुळ दूध संघावर सर्वच राजकीय नेत्यांचा डोळा असला तरी संघावर सत्ता ठेवण्यासाठी अनेकांनी टोकाची ईर्षा करण्याची तयारी देखील ठेवली आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: महायुतीतील सर्वच घटक पक्ष एका बाजूला असताना विरोधात दुसऱ्या बाजूला एकटे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे भिडले. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या वादळाबरोबर एकटे लढत असताना कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपला जिल्ह्यात दबदबा दाखवून दिला. पण आता इतक्यावरच थांबणार नाही तर जिल्ह्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेले गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शड्डू ठोकून त्यांनी थेट महायुतीच्या नेत्यांविरोधात महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे खुले आव्हान दिले आहे.

मार्च महिन्यात कोणत्याही क्षणी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघावर सर्वच राजकीय नेत्यांचा डोळा असला तरी संघावर सत्ता ठेवण्यासाठी अनेकांनी टोकाची ईर्षा करण्याची तयारी देखील ठेवली आहे. त्याचा प्रत्यय मागील निवडणुकीत आला आहे. गेल्या पंचवीस वर्षातील महाडिक सत्ता खालसा करण्यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गोकुळवर सत्ता स्थापन केली. गोकुळ संघातील महत्त्वाचे दोन माजी जिल्हाध्यक्ष पाटील मुश्रीफ यांच्या गळाला लागल्याने 25 वर्षाची महाडिक गटाची सत्ता खालसा झाली.

कोल्हापूर महानगरपालिकेत आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचा किल्ला लढवल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 34 नगरसेवक निवडून आणत महापालिकेत देखील काँग्रेसचा दबदबा ठेवला आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील तब्बल 15 सदस्य निवडून आणत जिल्ह्यात आपले वर्चस्व ठेवले आहे. त्यामुळे आता गोकुळच्या रणांगणात सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. सध्या सतेज पाटील यांच्याकडे सात संचालक आहेत.

कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस व मित्रपक्षांच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार संभारभात सतेज पाटील यांनी गोकुळचे रणशिंग फुंकले. येत्या मार्चमध्ये गोकुळचे रणांगण तापणार असून, त्यात महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढूया’, असे आवाहनही त्यांनी केले

Satej Patil
Parth Pawar: मुंढवा जमीन व्यवहारात पार्थ पवारांना क्लीन चीट! तहसीलदार, उपनिबंधकावर कारवाई होणार; बावनकुळे देणार फडणवीसांकडे अहवाल

नरके व ए. वाय पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात

मागील निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेले माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शिवसेनेत आणि अरुण डोंगळे यांनी मुश्रीफ यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर गत निवडणुकीत महाडिक गटासोबत असलेले गोकुळ संचालक चेतन नरके यांनी यंदा पाटील गटासोबत आहेत. तर ए. वाय पाटील मागील वेळी मुश्रीफ यांच्यासोबत होते. तर आता पाटील गटासोबत आहेत. त्यामुळे गोकुळमध्ये यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com