Gokul Dudhsang 2026 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Milk Election: गोकुळच्या राजकारणात खळबळ! ऐन निवडणुकीत 427 दूध संस्थांवर कारवाई; सर्वपक्षीय नेत्यांना धक्का

Gokul Milk Election Membership of 427 Societies Cancelled: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर ४२७ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांना धक्का बसला आहे. पुणे विभागीय दुग्ध निबंधक राजकुमार पाटील यांच्या आदेशाने गोकुळच्या राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे

427 दूध संस्थेचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सर्व पक्षीय नेत्यांनी या 427 दूध संस्थेचे ठराव निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दाखल केले आहेत. त्यामुळे नेत्यांना देखील धक्का मानला जातो. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी नेत्यांनी ठेवली आहे. आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी तक्रार दाखल केली होती.

कोल्हापूर दुग्ध निबंधक कार्यालयाकडून यावर कारवाई करण्यात आली होती. शिवाय ठराव मसुदा नं पाठवण्याची भूमिका घेतली होती. मात्र काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी न्यायलयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इशारा देताच दुग्ध निबंधक कार्यालयाकडून या संस्थांना ठराव मसुदा पाठवल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय निकाली काढण्यात आला होता

त्यानंतरही गोकुळ मधील ४२७ संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश पुण्याचे विभागीय उपनिबंधक ( दुग्ध) राजकुमार पाटील यांनी सोमवारी उशिरा दिले. बेलवाडे यांच्या तक्रारीवरून विभागीय उपनिबंधक यांनी एसआयटी समितीची स्थापना करून ही चौकशी केली होती. गोकुळ दूध संघाचे या संस्था बेकायदेशीररित्या नोंदणी झाल्याचे आरोप ठेवून चौकशी करण्याचे निर्देश विभागीय उपनिबंधकांनी दिले होते.

या आदेशास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. ही स्थगिती असतानाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रारूप मतदार यादी तयार होत असताना या चौकशी पूर्ण करून अहवाल सादर झाल्याने या ४२७ संस्थांचे सभासदत्व रद्द करावे, असा एकतर्फी आदेश विभागीय उपनिबंधकांनी गोकुळ दूध संघास दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT