Unmesh Patil News: शिवसेनेच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल; PSI वरील आरोप भोवले, नेमकं प्रकरण काय?

Shiv Sena leader Unmesh Patil has been booked in Chalisgaon: चाळीसगाव येथील आंदोलनादरम्यान PSI संदीप घुले यांच्यावर गंभीर आरोप करणारे माजी खासदार उन्मेश पाटील अडचणीत आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shiv Sena leader Unmesh Patil has been booked in Chalisgaon
Shiv Sena leader Unmesh Patil has been booked in ChalisgaonSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News:शिवसेनेचे नेते, जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यांचे राजकारण तापलं आहे. रविवारी रात्री त्याच्यांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षक एका महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी करीत असल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी एका जाहीर सभेत आपल्या भाषणात केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल कऱण्यात आला असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

Shiv Sena leader Unmesh Patil has been booked in Chalisgaon
Ashadhi Wari 2026: पंढरपूरसाठी 16 विशेष रेल्वे; आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचा प्रवास होणार सुलभ

रविवारी (२८ जून) चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर एका प्रकरणात धरणे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात माजी खासदार उन्मेष पाटील हे सहभागी होते. यावेळी भाषण करताना त्यांनी तेथील पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप घुले यांच्यावर गंभीर आरोप केले. घुले यांच्याबाबत अपशब्द वापरले, शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पाटील यांच्या भाषणाची दखल पोलिस प्रशासनाने घेतली आहे. पोलीस अधिकाऱ्याची बदनामी आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपनीय शाखेचे अंमलदार योगेश दिलीप बेलदार यांनी तक्रार दिली आहे.

Shiv Sena leader Unmesh Patil has been booked in Chalisgaon
PM-FCT New: मुलांच्या आरोग्य, शिक्षणावर सरकारची डिजिटल नजर! काय आहे PM-FCT Tracker?

पीएसआय घुले हे निष्पाप तरुणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देत असल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी केला. सार्वजनिक व्यासपीठावरून केलेल्या विधानामुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांची उपस्थित जनसमुदायासमोर बदनामी झाली आहे. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com