Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेवट गोड झाला असला तरी ऐन मतदानावेळी त्यात मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीचे सर्व नेते एकाच छताखाली आले असले तरी, चौदाशे ठराव धारकांची धास्ती आजही महायुतीच्या अनेक घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे.
त्यामुळे ठराव धारकांना भंडारा उचलण्याची अट अनेक नेत्यांनी घातली आहे. शिवाय ज्या आदर्श शक्तीने 1400 ठराव धारकांना न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्या सभासदांकडून दगाफटका केला जाण्याची शक्यता असल्याने या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महायुतींच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळात होरपळत असताना एका ठराव धारका मागे जवळपास एक ते तीन लाखापर्यंतची उधळण होत आहे.
राज्यातील प्रमुख असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले असताना महायुतीतील अंतर्गत मतभेदामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राजकारण ढवळून निघाले होते. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड , असं विधान करून महायुती एकसंघ असल्याचे दाखवून दिले. असे असताना शेवटच्या क्षणी देखील महायुती मधील अनेक घटक पक्षातील उमेदवारांमध्ये अदृश्य शक्ती बद्दल नाराजी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दिलेला न्यायालयीन त्रास अनेक सभासद विसरण्याच्या मनस्थितीत नाहीत.
त्यामुळे एक दिलाने लढणाऱ्या महायुतीला 1400 सभासदांचा दणका मिळण्याची शक्यता आहे. कारण महायुतीमधील घटक पक्षांमधील अदृश्य शक्तीला या सभासदांची धास्ती आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सभासदांना सहलीवर पाठवण्याचे नियोजन केले जात आहे. अनेक तालुक्यातील सभासद हे सहलीवर गेले आहेत. तर येत्या दोन ते तीन दिवसात जवळपास अडीच ते तीन हजार सभासदांना सहलीवर पाठवण्याची व्यवस्था महायुतीतील घटक पक्षांकडून केली जात आहे.
दरम्यान प्रत्येक ठराव धारकावर वर्षभरापूर्वी लाखापर्यंतचे टोकन दिल्याची माहिती होती. तेव्हापासून ते मतदान होईपर्यंत एका सभासदावर किमान दीड ते साडेतीन लाखापर्यंतचा खर्च केला जात असल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र, एवढा खर्च करूनही जर सभासद अदृश्य शक्तीला दणका द्यायच्या तयारीत असेल तर त्याकडून शकता घेण्याचे नियोजन देखील काही घटक पक्षातील नेत्यांकडून केले जात आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून चौदाशे ठराव धारकांना न्यायालयाच्या कचेरीत ओढण्यात आले. संस्था पात्र आणि अपात्र करण्यासाठी काही अदृश्य शक्ती कार्यरत होती. मात्र महायुती झाल्यापासून हे सर्व सभासद एक होतील अशी अपेक्षा अदृश्य शक्तीला आहे. मात्र सहा महिने झालेला त्रास हे सभासद विसरतील का? अशी शंका अनेकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत झाल्याची माहिती अंतर्गत गोटातून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.