New Governors : देशातील 6 राज्यांना मिळाले नवे राज्यपाल; CM विजय यांना तीनवेळा परत पाठवणारे आर्लेकर पुन्हा तमिळनाडूमध्येच

India Governor Appointments : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा राज्यांच्या राज्यपालांच्या फेरबदलांतर्गत चार नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तर सिक्कीम आणि केरळच्या राज्यपालांची अनुक्रमे केरळ आणि तामिळनाडू येथे बदली करण्यात आली आहे.
India Governor Appointments | Draupadi Murmu | New Governors
India Governor Appointments | Draupadi Murmu | New GovernorsSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News, 13 Oct : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशातील विविध राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तर काही राज्यातील राज्यपालांचे फेरबदल केले आहेत. राष्ट्रपती भवनाकडून सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, सुधा यादव यांची कर्नाटक, ढाल सिंग बिसेन यांची उत्तराखंड, ब्रज मोहन राम यांची ओडिशा आणि दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सिक्कीमचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेल्या ओम प्रकाश माथूर यांची केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तमिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर्लेकर यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना शपथविधीच्या प्रक्रियेदरम्यान तीनवेळा मागे पाठवलं होतं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा राज्यांच्या राज्यपालांच्या फेरबदलांतर्गत चार नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तर सिक्कीम आणि केरळच्या राज्यपालांची अनुक्रमे केरळ आणि तामिळनाडू येथे बदली करण्यात आली आहे.

India Governor Appointments | Draupadi Murmu | New Governors
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंची FDA तून बदली? स्वत: पोस्ट करत संभ्रम केला दूर

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांची माहिती

कर्नाटकच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या सुधा यादव या हरियाणातील महेंद्रगड येथील लोकसभेच्या माजी खासदार आणि भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्य आणि 'राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगा'च्या सदस्य राहिल्या आहेत.

उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले ढाल सिंह बिसेन हे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील लोकसभेचे माजी खासदार आहेत. त्यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे.

India Governor Appointments | Draupadi Murmu | New Governors
Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेसला मोठा धक्का? 25 आमदार भाजपच्या संपर्कात; विजयेंद्रांचा दावा

धोबी समाजातील दलित नेते ब्रज मोहन राम यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते झारखंडमधील माजी खासदार आहेत. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले दुष्यंत गौतम हे भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या 'अनुसूचित जाती मोर्चा'चे माजी अध्यक्ष आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com