Gokul Election; CM Devendra Fadnavis, Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : महायुती एकत्रच रणशिंग फुंकणार! मंत्री मुश्रीफांची मोठी घोषणा, 'या' दिवशी होणार प्रचाराला सुरवात

Gokul Election Mahayuti Campaign: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच हसन मुश्रीफ यांनी २४ सप्टेंबरला संयुक्त प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याचे जाहीर केले.

Rahul Gadkar

Gokul Milk Union election: जागा वाटपावरून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती मधील घटक पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप यांनी सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती मधील अंतर्गत ही स्पर्धा अत्यंत टोकाची बनली असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

जागा वाटपाचे सूत्र ठरले नसताना आता महायुती म्हणून एकत्र प्रचाराला सुरुवात करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केली. 24 सप्टेंबर गुरुवारी महासैनिक दरबार येथून महायुतीची एकत्र सभा होणार आहे. त्यावेळीच प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

दरम्यान जागा वाटपाचा तिढा हा सात ऑक्टोबर रोजी सुटेल. जागावाटप निश्चित झाल्यानंतर ज्या त्या प्रवर्गातून माघार घेतली जाईल. ज्या पक्षाकडे जी जागा गेली आहे तेथील अर्ज कायम ठेवणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

गोकुळ निवडणुकीतमध्ये भाजप नेत्याकडून सर्वाधिक जागांवर दावा केला जात होता. त्यामुळे महायुतीमध्ये फूट पडले, अशी चर्चा होती. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सगळी सुत्रे फिरवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे नेतृत्व मुश्रीफ यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीमध्ये लढली जाणार हे निश्चित झाले. मुश्रीफ यांच्यासोबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यावर देखीलजबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

महायुतीचे पारडे जड?

गोकुळसाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे देखील ताकद लावत आहेत. महायुती वेगळी लढली असती तर त्यांना ही निवडणूक सोपी गेली असती अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, हसन मुश्रीफ यांच्याकडे या निवडणुकीची सुत्रे आली आहेत. त्यातच महायुती एकत्र लढणार असल्याने महायुतीचे पारडे या निवडुकीत जड असेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, जागा वाटपात महायुतीमध्ये निश्चित नसल्याने संधी न मिळालेले उमेदवार काय करणार यावर देखील पुढील राजकारणाची दिशा ठरेल, असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT