Kolhapur News, 05 Nov : गोकुळ दूध संघातील शासन नियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापुरातील या संस्थेचा वाद आता देशपातळीवर पोहोचला असून, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे.
गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना धक्का देण्यासाठी महायुतीने मोठी रणनीती आखल्याचे आतापर्यंतच्या घडामोडींवरून दिसून येत आहे. मात्र, या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनीही सरकारला थेट आव्हान दिले आहे.
या प्रकरणात रस्त्यावर उतरून आणि न्यायालयीन मार्गाने लढा देणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. आता या आंदोलनाचे ठिकाण आणि तारीखही त्यांनी जाहीर केली आहे.आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सतेज पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, "सरकारचे हे धोरण तमाम कोल्हापूरकरांच्या विरोधात आहे. हा कोल्हापूरकरांचा अपमान असून, त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निवडणुकीत माझ्या घरातील कोणीही उमेदवार नव्हते. मी नेता असल्यामुळे मला थांबवण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र, त्यापेक्षाही या मंडळींनी संपूर्ण कोल्हापूरचा अपमान केला आहे."
या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या ९ तारखेला सकाळी १० वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर 'कोल्हापूर संघर्ष मोर्चा' काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. या मोर्चात कोल्हापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. हा अपमान केवळ बंटी पाटील आणि त्या १३ जणांचा नसून, संपूर्ण कोल्हापूरकरांचा आहे. त्यामुळे सर्वांनी या संघर्ष मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.