Gokul Dudhsang 2026 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul election : 'गोकुळमध्ये उलटफेर! विनय कोरेंनी साथ सोडली; आता 'मुख्यमंत्र्यांचा शब्द' गोकुळचं राजकारण फिरवणार?' सावकारांनी नेमकी फॅक्ट सांगितली

CM order political impact in Gokul : गोकुळच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विनय कोरेंनी साथ सोडल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळण्याचा निर्णय घेतला जाणार असून सावकारांनी यामागची नेमकी भूमिका स्पष्ट केली.

Rahul Gadkar

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत युतीमध्ये असून जनसुराज्य शक्तीचे नेते आणि आमदार विनय कोरे यांनी तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांना साथ देत गोकुळमध्ये सत्तातर घडवून आणले होते. त्यावेळी कोंरे हे महाडिक यांच्या विरोधात होते.

मात्र सध्या महायुती सरकारमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची साथ सोडण्याची भूमिका आमदार विनय कोरे यांनी घेतली आहे. नुकतंच त्यांनी महायुती म्हणून गोकुळ दूध संघाची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.

गोकुळ दूध संघाच्या प्रशासक नियुक्ती वर बोलताना आमदार डॉ. विनय कोरे यांनी नव्या कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. अ वर्गातील दूध संस्थांबाबतचे नोटिफिकेशन काढण्यात आले. त्यामध्ये ‘गोकुळ’च्या संस्थांचाही समावेश होता. तो निर्णय केवळ ‘गोकुळ’पुरता नाही. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार महायुती म्हणूनच ‘गोकुळ’मध्ये लढणार,’ असे सूतोवाच आमदार विनय कोरे यांनी केले.

कोरे म्हणाले, ‘गोकुळच्या संस्थांबद्दल अर्धसत्य सांगितले जाते. दुग्धविकास खात्याचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील काही दूध संस्थांबद्दल नोटिफिकेशन केले होते. त्यामध्ये ‘गोकुळ’च्या संस्थांचाही समावेश होता.

मात्र दाखवताना हे फक्त ‘गोकुळ’पुरते असल्याचे चित्र दाखवले जाते. पुढे हा वाद न्यायालयात गेला. पण ‘गोकुळ’ची निवडणूक मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महायुती म्हणूनच होईल.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT