

नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र पेपरफुटीच्या गंभीर प्रकारामुळे केंद्र सरकारने 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता पुढे काय होणार, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
देशभरातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा नीट परीक्षा दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षा झाल्यानंतर काही तासांतच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयमार्फत होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नाही. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज किंवा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. 3 मे 2026 रोजी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जुने अर्ज वैध राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
नवीन परीक्षेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. आधी भरलेली फीच ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. सध्या सीबीआयमार्फत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे जुनीच राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच 3 मे रोजी ज्या केंद्रावर परीक्षा दिली होती, त्याच ठिकाणी पुन्हा परीक्षा घेतली जाऊ शकते. मात्र काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे बदल होऊ शकतात.
नवीन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट जारी करण्यात येणार आहे. जुने प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संकेतस्थळ तपासून नवीन हॉल तिकीट डाउनलोड करावे लागेल.
या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव वाढला असला तरी नव्या परीक्षेसाठी शांतपणे तयारी सुरू ठेवणे गरजेचे आहे. शासन आणि परीक्षा यंत्रणांकडून पुढील सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.