Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : अंजनगाव पुतळा वादावर गोपीचंद पडळकर आक्रमक; ‘खेलोबा मंदिरालगत चुकीचा पद्धतीने पुतळा बसविणं कदापि...’

Anjangaon Statue Controversy : अंजनगाव पुतळा वादावर गोपीचंद पडळकर यांनी रात्रीतून पुतळा बसविण्यावर आक्षेप घेत इशारा दिला असून योग्य पद्धतीनेच स्थापना करावी, अशी भूमिका मांडली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 April : अंजनगाव खेलोबा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे आमच्यावर सोपवा. पाच-दहा हजार ढोलांच्या गजरात आम्ही त्याठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवू. पण, ज्या पद्धतीने खेलोबा देवस्थानच्या परिसरात चुकीच्या पद्धतीने रात्रीच्या वेळा पुतळा आणून बसवताय, ही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

माढा तालुक्यातील अंजनगाव (Anjangaon) येथील खेलोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्यावरून गेली तीन दिवसांपासून गावात तणावाचे वातावरण आहे. त्याबाबत गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बसविण्याची राज्यात अत्यंत चुकीची पद्धत सुरू आहे. शिवाजी महाराजांबद्दल धनगर समाजाचे जे प्रेम आहे, ते ह्या लोकांना सांगायची गरज नाही. पुतळ्याला कोणाचाच विरोध नाही. पण, खेलोबा मंदिराच्या परिसरात जो धिंगाणा लावला आहे. ते योग्य नाही.

खेलोबा मंदिराचे ठिकाण काय आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? शिव आणि विष्णूचे हे पवित्र ठिकाण आहे. पट्टणकोडोलीत जोपर्यंत अंजनगावच्या खेलोबा देवस्थानचे वारस फरांडेबाबा येत नाहीत, तोपर्यंत पट्टणकोडीतील मंदिरात कोणीही जात नाही, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

अंजनगावमध्ये जो काही धिंगाणा घातला जात आहे, तो अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत आक्षेप नाही. मात्र, पद्धतीबाबत आमचा आक्षेप आहे. महाराजांचा पुतळा रात्रीत तिथं आणून बसवताय. तहसीलदारांच्या गाड्यांची तोडफोड करता. हे कशासाठी केलं जातंय. मराठवाड्यात जे लोण पसरलंय ते तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात आणायचं आहे का. यामागे जो कोणी आहे, त्याचा मुळापर्यंत पोलिसांनी गेलं पाहिजे, असे आवाहन पडळकर यांनी केले.

ते म्हणाले, सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी मी ती दिवसांपासून संपर्कात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. त्या ठिकाणी जे चुकीचे काम सुरू आहे, ते थांबलं पाहिजे. रात्री-अपरात्री कसं पुतळा बसवता. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याचा दर्जा काय आहे, हे पाहिले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT