Manoj Jarange On Anjangaon : अंजनगाव प्रकरणी मनोज जरांगेंची धनगर-मराठ्यांना हात जोडून विनंती; ‘पुतळ्याच्या आडून कोणाचा डाव यशस्वी होऊ देऊ नका’

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy : अंजनगाव पुतळा वादावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा-धनगर समाजाला शांततेचे आवाहन करत एकत्र येऊन संवादातून तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 March : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिराच्या प्रवेशाद्वारालगत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेली तीन दिवसांपासून गावात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही बाजूंकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे. अंजनगावमधील तणावावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. माझी धनगर आणि मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की पुतळ्याच्या आडून कोणाचे काही डाव असतील तर ते यशस्वी होऊ देऊ नका. आपण एकत्र बसून शांततेत त्यावर तोडगा काढू, असे आवाहन केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, धनगर आणि मराठा समाजाला माझी विनंती आहे की, तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्यावर निश्चितपणे तोडगा काढू. पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला कोण तोडतंय का?, असा कोणाचा डाव आहे का? यावर मराठा आणि धनगर समाजाने लक्ष ठेवले पाहिजे. मग तो भूम, कळंब अथवा अंजनगावचा असो.

कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काय तरी भडक प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करेल. नेत्याला तशी सवयच नसते. ते नेहमीच बोंबलत इकडं तिकडं फिरत असतं. त्याला ती सवयच असते, त्यामुळे धनगर आणि मराठा बांधवांनो समजून घ्या. दोघांनी शांतता ठेवावी. आपण त्यावर बसून शांततेत तोडगा काढू, अशा शब्दही जरांगेंनी दिला.

ते म्हणाले, मी आज संध्याकाळी अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादाची पूर्ण माहिती घेतो आहे. या प्रकरणावर शांततेत तोडगा निघेल, त्यावर धनगर आणि मराठा बांधवांनी विश्वास ठेवावा. वाद होईल, अशी ठिकाणी आपण शांततेने घेतले पाहिजे.

Manoj Jarange Patil
Anjangaon Statue : अंजनगावातील पुतळा आमदार अभिजीत पाटलांनी स्थलांतरित होऊ दिला नाही : लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

अंजनगावचा दौरा करायचं की नाही, याबाबत अजून ठरलं नाही. पण आज संध्याकाळी मी तेथील संपूर्ण प्रकाराची माहिती घेतो. नेमकं काय घडलं आहे, हे जाणून घेतो. आज सकाळीच मी अंजनगाव येथील वादाची माहिती घेणार होतो. पण, अपघाताची माहिती मिळताच मी अंत्यसंस्काराठी इकडे आलो आहे, असे जरांगेंनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, अंजनगाव प्रकरणाची आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो. पण माझी धनगर आणि मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे की, शांततेत राहावा. आपण बसून त्यावर तोडगा काढू. कोणती तरी येईल, एखादी बजबजपुरी. वळवळ करून पुन्हा माघारी जाईल आणि विनाकारण वादंग निर्माण करेल. त्यामुळे मराठा आणि धनगर बांधवांनी समजून घ्यावं.

Manoj Jarange Patil
Satara ZP : सभापती निवडीपूर्वीच साताऱ्यात मोठी घडामोड : मंत्री जयकुमार गोरेंनी अचानक केली ZP इमारतीची पाहणी; भाजपच्या स्ट्रॅटेजीची पुन्हा चर्चा

आपण शांततेत त्यावर तोडगा काढू. पुतळ्याच्या प्रकरणावरून कोणाचे काही डाव आहेत का?, असतील तर ते मात्र कोणी यशस्वी होऊ देऊ नका. या प्रकरणामागे कोणाचे तरी डाव असण्याची जास्त शक्यता आहे. पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा, अशी दाट शक्यता असती, त्याचा विचार करा आणि शांत राहावा, त्यावर आपण निश्चितपणे तोडगा काढू, असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजबांधवांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com