Car used by MLA Gopichand Padalkar seen with a fancy illegal number plate and no HSRP, triggering debate over traffic rule enforcement. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar Car : नेत्यांसाठी वेगळा नियम आहे का? गोपीचंद पडळकर वापरत असलेल्या आलिशान गाडीची पावती फाटेना...

Gopichand Padalkar car number plate controversy : वाहतूक नियमांनुसार सर्व वाहनांना HSRP सक्तीची आहे. दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांना HSRP अनिवार्य आहे, जी क्रोमियम होलोग्राम आणि लेझर-कोरीव पिनसह येते. खाजगी वाहनावर पांढऱ्या पाटीवर काळ्या रंगात नंबर असणे आवश्यक आहे.

Rahul Gadkar

Sangli News, 19 Mar : एरवी एखाद्या शुल्लक करणावरून सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखवत वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून दंड वसुल केला जातो. एखाद्याला दंड नाही भरला तरी त्याला न्यायालयात खेचले जाते. पण एखाद्या लोक प्रतिनिधीने बेकायदेशीर नंबरप्लेट किंवा कायद्याचे उल्लंघन केले तर त्याला सर्व माफ.

हीच परिस्थितीत सध्या सांगली जिल्ह्यातील आहे. विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार वापरत असलेल्या आलिशान गाडी चर्चेत आहे. थेट कायद्यालाच आव्हान देत वाहनाची नंबरप्लेट फॅन्सी करून टाकली आहे. तर बंधनकारक केलेल्या HSRP नंबरप्लेट अद्याप पत्ताच नाही.

त्यामुळे प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात? की ते दबावापोटी कारवाई करत नाही? यांचा शोध घेणे महत्वाचे आहे. शिवाय ज्या लोकप्रतिनिधीकडे बघून पुढील पिढीने काय आदर्श घ्यावा? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. बुधवारी सांगली जिल्हा परिषदेची अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड पार पडली. त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी हजेरी लावली होती.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर देखील याठिकाणी उपस्थित होते. ते वापरत असलेले व त्यावर 'महाराष्ट्र - 10, ई.डी 007' असा उल्लेख असलेली गाडी चांगलीच चर्चेत आली. मुळात विधानसभेचे सदस्य असलेल्या वेगळा नियम आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुळात फॅन्सी नंबरप्लेट असणे हे बेकायदेशीर आहे. शिवाय सध्या HSRP ही नंबरप्लेट बंधनकारक केली आहे. तर वाहनावर चार अंकी नंबर असणे आवश्यक आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसून ही गाडी रस्त्यावर फिरते. त्यात आमदार गोपीचंद पडळकर ही गाडी वापरतात.

वाहनावर साडेपाच हजारांचा दंड

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर वापरत असलेली गाडी आलिशान आहे. त्यावर पूर्वी पासून साडेपाच हजार रुपये दंड आहे. प्रादेशिक परिवहन यांच्या संकेतस्थळावर जाऊन MH10ED007 असे शोधल्यास वाहनाचा तपशील दाखवत नाही. मात्र MH10 ED 0007 तपशील टाकल्यास ए के ऑटो या नावाने गाडी रजिस्टर आहे. त्यावर पूर्वीपासून साडेपाच हजार रुपये दंड असल्याचे रेकॉर्डला दिसते.

वाहनांच्या नंबरप्लेटबाबतचे कायदे व नियम काय?

सर्व वाहनांना HSRP सक्तीची आहे. दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांना HSRP अनिवार्य आहे, जी क्रोमियम होलोग्राम आणि लेझर-कोरीव पिनसह येते. खाजगी वाहनावर पांढऱ्या पाटीवर काळ्या रंगात नंबर असणे आवश्यक आहे. व्यावसायिक वाहनावर पिवळ्या पाटीवर काळ्या रंगात नंबर असणे आवश्यक आहे.

आकारबाबत आणि फॉन्टबाबत नंबर फक्त इंग्रजी (Latin) लिपीत आणि अरबी अंकात (Arabic Numerals) असणे बंधनकारक आहे. देवनगरी (मराठी) किंवा इतर भाषेत नंबर लिहिणे बेकायदेशीर आहे. दोन चाकी वाहनांसाठी पुढील प्लेट २६ सेंमी x ४ सेंमी आणि अक्षरे ३० मिमी उंचीची असावीत. बेकायदेशीर नंबरप्लेट: फॅन्सी फॉन्ट, चित्र, नाव किंवा देवनागरी लिपी वापरल्यास 500 ते 10 हजार पर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT