Rupali Chakankar controversy : अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांचं पद जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं केलं क्लिअर...
Pune News, 19 Mar : तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबाला बलात्काराच्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. खरातने अनेक महिलांचे दैवी शक्तीच्या नावाखाली शोषण केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे या भोंदूबाबाची पाद्यपूजा करत त्याला आपला गुरू असल्याचं वक्तव्य केल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे व्हिडिओ समोर आल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. खरातसोबतचे फोटो, व्हिडिओ आणि त्याच्याबाबत केलेली वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांसह राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
मात्र, अशातच आता राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची पाठराखण केली आहे. या सर्व प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा काहीही दोष नाही, त्या स्वतःहून गेलेल्या नाहीत तर कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या गेल्या असतील आणि त्यावेळी महाराजाचं दर्शन झालं असेल किंवा त्या भेटल्या असतील. कारण आपण कोणाला तरी गुरू मानतो, यामध्ये रूपाली चाकणकर यांची चूक नाही.
कधी तुम्ही जरी मला कुठे चला म्हणला मी आलो आणि पुढच्याने माझा फोटो काढला तर त्यावरून काय झालं तर यात माझी काय चूक ? असा सवाल उपस्थित करत भरणे यांनी चाकणकरांची पाठराखण केली आहे. त्यामुळे कॅप्टन खरात प्रकरणावरून अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे मोठे नेते दत्तात्रय भरणे धावून आल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे. 1 वर्षापूर्वी या प्रकरणाला वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आहेत.
त्यामुळे पोलीस कारवाई करत नव्हते का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शिवाय या प्रकरणात 58 व्हिडिओ समोर आले आहेत. म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झालेत का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार.
जर चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर पूर्ण राज्यात आंदोलन करणार. मी सुनेत्रा पवार यांच्या कानावर हे प्रकरण घालणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, सुनेत्रा पवार यावर निर्णय घेतील. या प्रकरणाचा पक्षाचा संबंध नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राष्ट्रवादीतच मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
