Sangli News: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
तर आता दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आमदार गोपीचंद पडळकरही आक्रमक झाले आहेत. तसेच पडळकरांनी धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत थेट तारीख देखील सांगितली आहे.
गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा सांगलीच्या आरेवाडीत पार पडला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न शेवटच्या टप्यात आला असल्याचेही सांगितले. धनगर समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
"धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. न्यायालयामधील धनगर आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून आरक्षणाचा निकाल आपल्या बाजूनेच लागेल", असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
"धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आपण न्यायालयात लढत आहोत, 8 डिसेंबर , 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या तीन तारखा न्यायालयाने धनगर आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत. त्यानंतर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालय निकाल देणार आहे", अशी माहिती पडळकरांनी मेळाव्यात बोलताना दिली.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.