Maratha Reservation News : मराठा तरुण मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत, त्यांना नोकर भरतीत सामावून घ्या..

Maharashtra News : अशोक चव्हाण यांच्या मागणीने राज्य सरकारची आणखी कोंडी केली आहे.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan News : कंत्राटी नोकर भरतीचा जीआर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने रद्द केला. तत्पुर्वी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्याआगोदर ज्या मराठा तरुणांची विविध विभागात निवड झाली होती, त्यांना नोकर भरती सामावून घेण्याचा निर्णय झाला होता. (Maratha Reservation News) मात्र अद्याप महावितरण, पीएसआय पदाच्या भरतीतील उमेदवारांना न्याय मिळालेला नाही. त्या सर्व उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Maratha Reservation News
Maratha Reservation News : आधी मराठा आरक्षण, मग पक्ष ; नांदेडमध्ये भाजप पदाधिकारी आक्रमक..

या दोन्ही विभागातील पदाच्या भरतीसाठीचे उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे. (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांनी राज्य सरकराचे लक्ष वेधून घेण्यासाठी एका व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. (Congress) विशेष म्हणजे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती देणारी जाहिरात राज्य सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थितीत केला आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारच्या जाहिरातीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. इडब्ल्यूएस आरक्षणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने जाहीरात दिली. या जाहीरातीत सरकारने मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे इडब्ल्यूएसच्या या आरक्षण प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळत असल्याचा उल्लेखही सरकारकडून केला गेला होता. यावर आता नव्या वादाला तोंड फुटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्या मागणीने राज्य सरकारची आणखी कोंडी केली आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आल्यानंतर अपुर्णावस्थेत असलेल्या अनेक विभागांच्या नोकर भरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदांवर सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, महावितरणच्या नोकर भरतीमधील मराठा उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पीएसआय पदाच्या भरतीमधील मराठा उमेदवारांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.

राज्य सरकारने तातडीने अशा सर्व उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भूमिकेनंतर समाज माध्यमांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन दिवसांपुर्वी जाहीर झालेल्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता सरळसेवा भरतीमध्ये ५२ ईडब्ल्यूएस उमेदवारांना डावलून इतरांना नियुक्ती देण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मराठा तरुणांना लवकरात लवकर नियुकत्या मिळाव्यात, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही समाज माध्यमातून केले जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com