Dhangar Reservation: Sar
पश्चिम महाराष्ट्र

Dhangar Reservation: धनगर आरक्षण बैठकीला पडळकर, जानकर, भरणे, शिंदेंनी मारली दांडी

Mangesh Mahale

Pandharpur News: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच ओबीसींनीही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अशातच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आज (शुक्रवारी) पंढरपुरात श्रेयश पॅलेस येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला धनगर समाजातील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली.

धनगर समाज आरक्षण मागणीसाठी आज सकाळी धनगर समाजातील सर्व पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. पण बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, राम शिंदे, महादेव जानकर, दत्तात्रय भरणे यांनी दांडी मारली.

लोकसंख्येच्या दृष्टीने मराठा समाजानंतर धनगर समाज हा राज्यातील सर्वात मोठा समाज आहे. लोकसभा निवडणुकीत किमान 10 ते 12 मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मते आहेत. त्यामुळे धनगर समाजाने आरपारच्या लढाईसाठी ही राज्यव्यापी निर्णायक बैठक बोलावली होती. बैठकीला भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व धनगर नेते एकाच व्यासपीठावर येणार होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीत अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणासाठी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला जाणार होता. बैठकीचे अचानक तातडीने आयोजन केल्याने वेळेअभावी सर्वांना सोशल माध्यमातून निरोप पाठविण्यात आले असल्याचे सकल धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. पण धनगर आरक्षणाच्या लढ्याला अद्याप पाहिजे तसा वेग आलेला नाही. आजच्या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले जाणार होते.

मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे-पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार आहेत. मुंबईकडे जाण्याचा मार्गही मनोज जरांगे यांनी जाहीर केला आहे.आता याचवेळी ओबीसी समाजही आपल्या मांगण्यासाठी आक्रमक झाला असून 20 जानेवारीला मुंबईत ओबीसी मोर्चासाठी मुंबई पोलिसांकडे ओबीसी जनमोर्चाने परवानगी मागितली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT