Kolhapur: भाजपच्या दाव्यानंतर या दोन जागा शिंदे गट लढणार?; मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार

Kolhapur Politics: उमेदवार कोण?
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर आणि हातकलंगले या जागांवर सध्या विद्यमान सदस्य म्हणून खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने सदस्य आहेत. या दोन पैकी एक जागेवर भाजपने दावा केला असला तरी दोन्ही जागांवर शिंदे गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जानेवारी महिन्यात कोल्हापुरात येणार आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी त्यांचे जाहीर मेळावे या दोन मतदारसंघात होणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात मेळावे होणार आहेत. यामध्ये २९ जानेवारीला कोल्हापूर आणि ३० जानेवारीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मेळावे होणार आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी येथे दिली.

Kolhapur Politics
Basanagouda yatnal: कोरोना भ्रष्टाचाराचा 'व्हायरस' भाजप आमदाराच्या अंगलट; पक्षश्रेष्ठी कारवाई करणार ?

क्षीरसागर म्हणाले, ‘मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेतील मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी यांची बैठक झाली. यात ‘शिवसंकल्प’ अभियानाद्वारे ६ जानेवारी २०२४ पासून राज्यभरात मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. पहिले पाऊल जाहीर होत आहे. कुठली जागा कुठला पक्ष लढवणार, उमेदवार कोण, मतदारसंघ कोणाला सोडणार, याबाबत सारख्या अफवा विरोधकांकडून परसवल्या जात आहेत. यापुढेही पसरवल्या जातील. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपण आपल्या सर्व जागा ताकदीने लढवूया, जिंकूया. आपली महायुती विजयी करुया. केलेल्या कामावर आपण मते मागूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्याशिवाय शिवसंकल्प अभियानातील दौरे जाहीर केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.’

Edited by: Mangesh Mahale

Kolhapur Politics
Raju Patil: राज ठाकरे-मुख्यमंत्री शिंदे नेहमी का भेटतात ? राजू पाटलांनी सांगितलं 'हे' कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com