Gopichand Padalkar, Sadabhau Khot
Gopichand Padalkar, Sadabhau Khot sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांना पोलिसांनी अडवले; रस्त्यावरच मांडला ठिय्या

सरकारनामा ब्यूरो

सांगली : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar memorial) स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) विरुद्ध भाजप (BJP) वाद उफाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी कडाडून विरोध केला आहे. सदाभाऊ खोतही (Sadabhau Khot) पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहेत. पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीमध्ये मोर्चा काढला आहे. दरम्यान, पोलिसांनी पडळकर आणि खोत यांना अडवले आहे. पडळकरांनी उद्घाटनाचा आग्रह धरत रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर पडळकर यांनी आक्षेप घेत, आज (ता. २७) स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी सांगलीत हजारो कार्यकर्त्यांसह दाखल झाले आहेत. मेढपाळांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले आहे. यासाठी त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढली आहे. मात्र, या पार्श्वभुमिवर पोलिसांनी सांगलीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. राज्य राखीव दलाच्या जवानांच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सांगलीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पडळकर म्हणाले, आम्ही आमच्या परंपारिक पद्धतीने इथे आलो. धनगरी नृत्यही सादर करण्यात येणार आहे. आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हा लोकार्पण सोहळा आमच्या मेढपाळांच्या हस्ते होणार आहे. मात्र, अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मने छोटी याचे दर्शन घडवत आहे, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केला आहे.

आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, पोलिसांनी अडवूनही एवढे लोक याठिकाणी पोहोचले आहेत. हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल असे थेट आव्हान पडळकर यांनी दिले आहे. ही कारस्थाने पालकमंत्री जयंत पाटील यांची आहेत. त्यांचे आयुष्यच अशा गोष्टींमध्ये गेले आहे. त्यामुळे त्यांना उद्घाटनाला बोलवणार नाही, असे पडळकर म्हणाले.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी येणाऱ्या २ एप्रिलपर्यत स्मारक परिसरातील शंभर संचारबंदी लागू केली आहे. गुरुवारी मध्यरात्री पासूनच बंदोबस्ताला सुरवात झाली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून आवश्यक रस्ता वगळता अन्य शंभर मीटर हद्दीतील रस्ते अडथळ्याद्वारे बंद करण्यात आले. स्मारकाच्या सभोवताली उंच लोखंडी पत्रे उभारून सर्व बाजू झाकण्यात आल्या आहेत. स्मारकस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काल बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला आहे. राखील दलाच्या जवानांच्या दोन तुकड्या सद्या स्मारकस्थळी दाखल झाल्या आहेत. हाय अलर्टची भूमिका घेत पोलिसांचा ताफा स्मारकस्थळी कडेकोटपणे बंदोबस्त बजावत आहे. आज रविवारी परिसरात बंदोबस्त आणखीन कडक करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT