Balasaheb Patil, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : धक्का बसेल म्हणून सरकार निवडणुका घेत नाही : बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil शहापूर (ता. कऱ्हाड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी बाळासाहेब पाटील बोलत होते.

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका पालिका, नगरपालिकांवर प्रशासक आहेत. सरकार निवडणूक घेण्याचे धाडस करत नाही. सरकार कोणत्या मार्गाने आले आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे. निवडणुका घेतल्या तर सरकारला धक्का बसू शकतो या भीतीने निवडणूक घेत नाहीत, अशी टीका आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.

शहापूर (ता. कऱ्हाड) Karad NCP येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी बाळासाहेब पाटील Balasaheb Patil बोलत होते. या वेळी कोयना भूकंप विकास निधीतून रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामांचे भूमिपूजन तसेच आमदार स्थानिक विकास निधी व २५/१५ व इतर ग्रामीण विकास निधीतून ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे याशिवाय विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

या वेळी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज पाटील, सुहास बोराटे, तानाजीराव साळुंखे, पै. संतोष वेताळ, जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वांगीण विकास केला आहे, राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याचे संपूर्ण अधिकार संबंधित विधानसभा सदस्यांना असत. मात्र, दुर्दैवाने सत्तारूढ पक्षाचे गाव पुढारी हक्क दाखवतात.

आपण मला विधानसभेच्या माध्यमातून जी ताकद दिली, त्या ताकतीचा व मिळालेल्या अधिकारांचा उपयोग मी मतदारसंघातील सर्व गावे, वाड्या, वस्त्यांना समान न्यायाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी केला, त्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे.

कोरोना काळात पालकमंत्री या नात्याने रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वेळोवेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचे काम केले. सध्या जिल्हा नियोजनच्या बैठका वेळेवर होत नाहीत. राज्यातील सरकारला असुरक्षित वाटत असल्यामुळे निवडणुका घेतल्या जात नाहीत.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT