

Marathwada Political News : जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघात अनेक जण चोऱ्या करत असून, कोणाचा पायपोस कोणाला नाही. अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या संमतीनेच हा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. कल्याण काळे (EX. Mla Kalyan Kale) यांनी केला. इतर ठिकाणी दूध विक्री करणाऱ्या इतर संस्थांवर त्यांनी कारवाई करूनच दाखवावी, असे आव्हानही काळे यांनी पत्रकार परिषदेत दिले. जिल्हा दूध संघाला यंदा ४० लाखांचा तोटा झाल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले आहे.
त्यावरून दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या कारभाराबाबत डॉ. कल्याण काळे यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हा दूध संघ भ्रष्टाचार व नियोजनाच्या अभावामुळे कधी नव्हे तो तोट्यात गेला आहे. (BJP) जेव्हा दूधसंघ सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेतला तेव्हा संकलन प्रतिदिन एक लाख लीटरपेक्षा जास्त होते, पण आज दूध संकलन ५० हजार लिटरपेक्षा खाली आले आहे. गेल्या पाच वर्षात नफा ७५ लाख होता, आता तोटा ४० लाख झाला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे दूध संघाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे डॉ. काळे म्हणाले. (Congress) दूध वितरणासाठी पूर्वी २५० डीलर होत, पण आता दोनच व्यक्तींना काम देण्यात आले आहे. दूध विक्री वाढावी म्हणून विक्री दर एक रुपयांनी कमी करण्यात आला पण डीलरांनी बाजारात दर कमी केलाच नाही, असा आरोपही काळे यांनी केला.
जिल्ह्यातील अनेक संस्था दूध संघाला दूध न देता, इतर ठिकाणी देतात, अशा संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा बागडे यांनी दिला होता, त्यावर त्यांनी कारवाई करूनच दाखवावी, असे आवाहन काळे यांनी दिले. संघाने एनडीडीबीचे तीन कोटी ३४ लाख १५ हजार ५८५ व २ कोटी २१ लाख ५५ हजार ५८९ रुपये कर्ज व एक कोटी अल्पमुदतीचे कर्ज घेतले.
२०२१-२२ या वर्षात व्यापारी, पगार व शासकीय देणे एक कोटी ९५ लाख ४८ हजार १३१ रुपये होते. २०२३ मध्ये हा खर्च ५० लाखाने वाढला. २ कोटी ४६ लाख ४ हजार ५०७ रुपये देणे झाले आहे. २०२२ मध्ये बॅंकेतील शिल्लक १ कोटी ३८ लाख २६ हजार ८६ रुपये एवढी होती. २०२३ मध्ये शिल्लक ४१ लाख ७४ हजार ३२८ रुपये शिल्लक आहेत, अशी माहितीही काळे यांनी यावेळी दिली.
दूध संघाचा व अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा बंगला सिडको एन-४ मध्ये आहे. दूध संघाने व बागडे यांनी समान आकाराची जागा भाड्याने दिली आहे. मात्र दूध संघाच्या बंगल्याला वार्षिक ३८ हजार ४०० तर बागडेंच्या बंगल्याला १ लाख ६० हजार एवढे भाडे आहे, हा फरक कसा? असा प्रश्न करत दूध संघात बागडे यांच्या संमतीनेच प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा पुनरुच्चार काळे यांनी केला. दूधसंघ वाचविण्यासाठी योग्य वेळी अध्यक्षावरअविश्वास ठराव आणला जाईल, असा इशाराही काळे यांनी दिला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.