Pandharpur News : मराठा समाजाला राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला घेता येणार नाही, त्यामुळे मराठा समाजाने मोठे नुकसान करून घेतले आहे, असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर वादंग उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maratha Reservation)
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील कार्यक्रमात घेराव घालण्यात आला. (Chandrakant Patil Pandharpur Tour )
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. २३ फेब्रुवारी) पंढरपुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. (EWS Reservation )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाटील म्हणाले, आपण सगळ्यांनी डोळे, कान उघडे ठेवून हे आरक्षण देण्याचे काम केले आहे. मराठा समाजाला सरकारने जे १० टक्के आरक्षण दिले आहे, ते न्यायालयात टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ते आरक्षण सरकार शंभर टक्के टिकविणार. दहा टक्के मराठा आरक्षणाचा देण्याचा ड्राफ्ट हा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमने वाचल्यानंतरच अंतिम करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरेची जी व्याख्या नोटिफिकेशनमध्ये मान्य केली होती. ती मान्य केल्यानंतरच जरांगे गावाला परत गेले होते. मुख्यमंत्री जरांगे यांना दिलेल्या शब्दापासून थोडेही मागे हटलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले, ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. पण आपला देश हा पितृसत्ताक आहे. त्यामुळे पित्याकडील लोकांना कुणबीचा दाखला मिळेल. पण, मातृ म्हणून आणून नका, हेही सर्वांना मान्य आहे. त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन करणे योग्य नाही.
काही वेळ गोंधळाचे वातावरण
सरकोली येथील कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा समाजाने ओबीसी आरक्षणासाठी घेराव घातला. या कार्यक्रमातच मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पालकमंत्री पाटील यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच, सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
Edited By : Vijay dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.