Government Employees on strike Pramod Ingale, Satara
पश्चिम महाराष्ट्र

Old Pension News: जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा; 13 हजार कर्मचारी संपावर

Employees on Strike: सोमवारी (13 मार्च) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात समाधानकारक तोडगा न निघाल्याने आजपासून सरकारी कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

Umesh Bambare-Patil

Satara News : जुनी पेन्शन योजना Old Pension Yojana लागू करावी या मागणीसाठी आज सरकारी कर्मचारी Government Employee संपावर असून विविध शासकिय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत तातडीने जुनी पेन्शन याोजना लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. या संपात 13 हजार 565 सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून (14 मार्च) राजातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यात मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सपाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. साताऱ्यात आज जुनी पेन्शन योजनेसाठी 13 हजार 565 सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले असून कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

काल सोमवारी (13 मार्च) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात समाधानकारक तोडगा न निघाल्याने आजपासून सरकारी कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला. या संपात सातारा जिल्ह्यातील विविध विभागातील सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी एकत्रित आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा, शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांना समाविष्ट करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, आदी घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या.

राज्य सरकारसोबत जुनी पेन्शन योजनेची बैठक निष्फळ ठरली असल्याने ४६ वर्षांनी राज्य सरकार आणि कर्मचारी आमने-सामने आले आहेत तर आजपासून 18 लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जुन्या पेन्शन योहजेवरून कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहे

तर कर्मचाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारनेही कारवाईचा इशारा दिला आहे. जे कर्मचारी या संपामध्ये भाग घेतील त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सरकारने ठणकावून सांगितले आहे. त्याचबरोबर काम नाहीतर वेतन नाही, असे सांगत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना इशाराही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT