Satara News : नागालॅंडमधील बैठकीला मी नव्हतो, असे सांगून तिथं ठरलं तसं उद्या इथंही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल. त्यामुळे मला माहिती नाही. पण, वेट अँड वॉच, असे सूचक वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी केले आहे.
खासदार उदयनराजे यांनी आज साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर निवेदन दिले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र स्थापन केलेल्या सरकारबाबत सूचक वक्तव्य केले.
महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीत वाद होत असताना नागालॅंडमध्ये मात्र एकत्र सत्ता स्थापन केली आहे, याविषयी विचारले असता उदयनराजे म्हणाले, मी त्या बैठकीला नव्हतो, त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही. तिथं जे ठरलं तसेचं उद्या इथं ही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल.. मला माहिती नाही, पण वेट अँड वॉच असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का, या प्रश्नावर त्यांनी झाडाकडे पहात पक्षांचे विचारा पक्षाचे नको, असे म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.