Gram Panchayat Election Results Parunde Village
Gram Panchayat Election Results Parunde Village  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election Results : निवडणुकीत संपूर्ण गाव जिंकलं अन् एकच धुरळा उडाला!; बघा जुन्नरमधील पारुंडे गावात काय घडलं...

दत्ता म्हसकर

Maharashtra Gram Panchayat Election Results : जुन्नर, पुणे : राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींचे निकाल आज निकाल लागत आहेत. ठिकठिकाणी विजयी उमेदवार आणि पॅनेलकडून गुलाल उधळला जात आहे. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ही पहिलीच मोठी निवडणूक होत आहे. यामुळे या निडणुकीच्या निकालाला महत्त्व आलं आहे. राज्यात एकीकडे, विजयी उमेदवार जिंकल्याचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या पारुंडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपूर्ण गावच जिंकलं आहे. या गावातील ग्रामस्थांनी राज्यासमोर एक आदर्श ठेवला आहे.

पारुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड करून गावच्या ज्येष्ठ व अनुभवी मंडळींनी पारुंडे (ता. जुन्नर) गावाचा एकोपा जपला आहे. पुढील लिंकवर क्लिक करा आणि वाचा निकाल... Gram Panchayat Election Results LIVE Updates )

थेट सरपंचपदी जयेश पिलाजी पुंडे यांची, तर सदस्यपदी मयूर दशरथ पवार, हौशीराम जनार्धन केदार, रोहिणी आकाश मोदे ,शीतल जालिंदर पुंडे, स्वाती संजय पवार, किसन विष्णू जाधव, मंगेश किरण पुंडे, विजया बबन पुंडे, कार्तिकी संतोष भालेराव यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश भोसले यांनी जाहीर केले.

ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अविनाश पुंडे, निवृत्ती जाधव, विकास पुंडे, अशोक पुंडे, मनोज पुंडे, शंकर पवार, सुनील पुंडे, खंडू पवार, माऊली पवार, प्रशांत पवार, अशोक जाधव, शामकांत पवार, वसंत पवार, जितेंद्र पुंडे, किरण पुंडे, प्रवीण पवार, संजय पवार, तुकाराम जाधव, भास्कर पवार, प्रवीण पुंडे यांनी विशेष प्रयत्न केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT