Gram Panchayat Election Result : गावगाड्याचा गुलाल उधळणार; जिल्ह्यातील आमदार, संचालकांची प्रतिष्ठा पणाला

Kolhapur Gram Panchayat News : आगामी विधानसभा निवडणुकीची चाचणी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते.
Kolhapur Gram Panchayat Election
Kolhapur Gram Panchayat ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics News : आगामी विधानसभा निवडणुकीची चाचणी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. गावगाड्याच्या बेरजेच्या राजकारणामुळेच अनेक राजकीय नेत्यांचे राजकीय भविष्य अवलंबून असते.

प्रत्यक्षात सहभाग घेता येत नसला तरी आपला गट टिकवण्यासाठी दक्षिण, करवीर, चंदगड आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे.

Kolhapur Gram Panchayat Election
Gram Panchayat Election: गावाचा 'कारभारी' आज ठरणार; गुलाल कोण उधळणार...मविआ की महायुती?

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी कोल्हापुरातील रमणमळा परिसरात केली जात आहे.

जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायती व ११ प्रभागात रविवारी (ता. 5) अत्यंत चुरशीने मतदान झाले. प्रमुख नेत्यांची गारगोटी, शिरोली दुमाला, सरवडे, कसबा वाळवे, सुपात्रे, पिंपळगाव आदी ठिकाणी गावगाड्यातील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विधानसभा मतदारसंघ पातळीवरील राजकारण करताना आपली ग्रामपंचायत ताब्यात असणे महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील राजकारणाचा परिणाम गावपातळीवरही झाल्याचे दिसून येते. अनेक गावे गटात विभागली गेली असल्यान र्ईर्षेला टोकाला पोहाेचली आहे. (Kolhapur)

त्यामुळे इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांच्या गावात ग्रामपंचायतची रणधुमाळी उडाली आहे. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघातील आपले गाव ताब्यात राहण्यासाठी यांची धावपळ उडाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Kolhapur Gram Panchayat Election
Sunil Tatkare News : 'चिन्ह तेच, विचार तेच, नवीन पर्व सुरू, 2 जुलैचा निर्णय अचानक नव्हता; तटकरेंचे सूचक वक्तव्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com