Samarjit Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Samarjit Ghatge : कागल मतदारसंघाबाबत समरजीत घाटगेंचं मोठं विधान; महायुतीत वाद पेटणार?

Samarjit Ghatge vidhan sabha Election Kolhapur : भाजपाचे नेते समरजीत घाटगे या दोघांपैकी एक संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष उसळून आल्याचे पाहायला मिळत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Vidhan Sabha : कागलमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपाचे नेते समरजीत घाटगे या दोघांपैकी एक संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष उसळून आल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन्ही गटात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली असून वरिष्ठ नेत्यांवर आतापासूनचं दबावतंत्र सुरु असल्याचे चित्र आहे. आशाताच समरजीत घाटगे यांच्याविरोधात माध्यमातून सुरु असलेल्या बातम्यांमुळे कागलमधील राजकारण ढवळून निघाले आहे. घाटगे यांना राष्ट्रवादी शरद शरद पवार गटाने संपर्क केल्याचे माहिती समोर आल्यानंतर घाटगे यांनी ही माहिती खोडून काढली आहे.

भाजप नेते समरजीत घाटगे (Samarjit Ghatage) यांनी बोलताना, मी महायुतीतच आहे. माझ्याबद्दल काहींकडून खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागलमधून मीच आमदार होणार आहे. असा विश्वास व्यक्त करत माझी तयारी पूर्ण झाल्याने काहींच्या पोटात गोळा आला आहे. वेळप्रसंगी अपक्ष लढू पण इतर ठिकाणी जाणार नाही. भाजप नेते समरजीत सिंह घाटगे यांची सरकारनामाला माहिती दिली आहे.

समरजीत घाटगेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गळ?

दरम्यान, कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी (Vidhansabha Constituency) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या समरजीत घाटगे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गळ घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटाकडून दोन वेळा समरजीत घाटगे यांना संपर्क झाल्याची सूत्रांनी माहिती आहे.

समरजीत घाटगे यांच्याकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यांनी या घटनेचं खंडन केले आहे. घाटगे यांना आपल्या बाजूला वळवण्याची जबाबदारी शरद पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर असल्याचेही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय असलेल्या समरजीत घाटगे यांनी पवार गटाचा प्रस्ताव अद्याप स्वीकारला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही घाटगे यांचे राजकीय गुरु असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT