Rohit Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Suresh Khade On Rohit Patil : 'रोहितचे हाल करू नका...'; आमदार सुमनताई पाटलांना पालकमंत्री सुरेश खाडेंची भावनिक साद

NCP : 18 गावांच्या पाण्याच्या प्रश्नावरून रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Ganesh Thombare

राहुल गडकर

Sangli News: सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 18 गावांना हक्काचं पाणी मिळण्यासाठी टेंभू योजनेतील तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. रोहित पाटील यांची तब्येत ठीक नाही, तरीही त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

रोहित पाटील यांची प्रकृती सायंकाळी बिघडली असून उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आमदार सुमनताई पाटील यांना भावनिक साद घालत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

"उद्याच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर येथील परिस्थिती मांडू, मी त्याच तालुक्याचा पुत्र आहे. माझ्याही गावाला पाणी जात नाही. मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मागणी मान्य करून घेतो", अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

याबरोबरच उद्यापर्यंत वाट बघा, दुपारनंतर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. मान्यता मिळाली असे समजून कागदपत्रे तयार करण्याचे आदेश टेंभूच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी दिले.

"रोहितला ताप खूप आहे, अशा परिस्थितीस उपोषण करू नये, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे रोहितवर प्रेम आहे. ही परिस्थिती आबाच्या पोरावर आली हे दुर्दैव आहे, पण रोहितचे हाल करू नका", अशी भावनिक साद पालकमंत्री खाडे यांनी आमदार सुमनताई यांना घातली. मात्र, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या भावनिक अहवानाला साद न घालता रोहित पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT