Rohit Patil News: टेंभूप्रश्नी उपोषणादरम्यान रोहित पाटलांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांचं पथक दाखल

NCP News: रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
Rohit Patil
Rohit Patil Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर :

Sangli News: तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 18 गावांच्या पाण्यावरून सांगली जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. या गावांना पाणी मिळण्यासाठी आमदार सुमन पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, युवा नेते रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली असून, उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे.

Rohit Patil
Rohit Patil Vs Sanjay Patil : रोहित पाटलांचा खासदार संजय पाटलांना इशारा; म्हणाले, 'तुमचा इतिहास...'

टेंभू योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 18 गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी आज सकाळपासून त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

पण त्यांची प्रकृती बिघडली असून, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रोहित पाटील यांना 102 डिग्री इतका ताप असल्याची माहिती डॉक्टरांच्या पथकाने दिली आहे, पण तरीही रोहित पाटील उपोषणावर ठाम असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देत रोहित पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर टेंभू विस्तारित योजनेसाठी 8 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतलेला आहे.

पण टेंभू योजनेला तिसरी सुधारित मान्यता राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत द्यावी, या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Rohit Patil
Wadettiwar on BJP : ‘जागर’ नव्हे बहुजनांची माथी भडकवण्यासाठी भाजपची ‘गाजर’ यात्रा, वडेट्टीवार कडाडले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com