Pandharpur bazar Samiti Sabhapati
Pandharpur bazar Samiti Sabhapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Bazar Samiti: वडिलांचा चिठ्ठीवर पराभव; पण मुलाची बिनविरोध बाजी : पंढरपूर बाजार समिती सभापतिपदी परिचारक समर्थक गायकवाड

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी चळे येथील परिचारक गटाचे कट्टर समर्थक हरिष गायकवाड यांची, तर उपसभापतिपदी पुळूज येथील राजू गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Harish Gaikwad as Chairman of Pandharpur bazar Samiti)

पंढरपूर (Pandharpur) बाजार समितीच्या (Bazar Samiti) १९९० च्या निवडणुकीत परिचारक गट पहिल्यांदाच उतरला होता. त्या गटाकडून हरिष गायकवाड यांचे वडील भास्करअप्पा गायकवाड हे संचालक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी सभापतीच्या (Sabhapati) निवडणुकीत भास्करअप्पा गायकवाड आणि विरोधकांना प्रत्येकी आठ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत चिठ्ठीवर भास्करआप्पा गायकवाड यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यांचे स्वप्न हरिष गायकवाड यांनी पूर्ण केले आहे.

निवडीनंतर नूतन सभापती आणि उपसभापतींचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभापती आणि उपसभापती निवडीसाठी सहाय्यक निबंधक डॉ. वैशाली साळवे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात सर्व सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली होती. यामध्ये सभापतिपदी हरीष गायकवाड, तर उपसभापतिपदी राजू गावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे वैशाली साळवे यांनी जाहीर केले.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नवनिर्वाचीत सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. प्रशांत परिचारक यांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून बाजार समितीचा नावलौकिक वाढवू, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी सभापती दिलीप घाडगे, माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे, सुभाष मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी ‌आमदार प्रशांत परिचारक , युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, युवानेते प्रणव परिचारक, बाजार समितीचे माजी सभापती, दिलीप घाडगे, पोपटराव रेडे, माजी उपसभापती विवेक कचरे, संतोष घोडके, लक्ष्मण धनवडे, वामन माने, तानाजी वाघमोडे, भैरू वाघमारे, सुभाष माने, बाळासाहेब देशमुख आदींसह नूतन सदस्य उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT