Harshada Kakade : भावीनिमगाव येथे नवरात्रीच्या पहिल्या माळेचा मुहूर्त पाहून जनशक्ती विकास आघाडीच्या शाखा स्थापनेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले ( Rajashri Ghule ) यांच्यावर नाव न घेता टीका केली.
दिलीप काळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अॅड. शिवाजीराव काकडे, कारभारी मरकड, मनोज घनवट, गोविंदराव मुंगसे, भाऊसाहेब सातपुते, अॅड. अण्णासाहेब मराठे, आबासाहेब राऊत, मनोज घोंगडे, कचरू शेळके, संजय शेळके, अकबरभाई शेख, एकनाथ जगधने महिला अध्यक्ष शुभांगी थोरात, भागूबाई शिरसाठ, राणी दळे, कावेरी निकम, लताबाई दळे, रंजना निकम, कमल दळे महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते. शहरटाकळी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील गवळी, दत्तात्रय बोरुडे, बप्पा गाडे, सोमनाथ बुचुडे यांनी जनशक्ती मध्ये प्रवेश केला.
हर्षदा काकडे म्हणाल्या की, ज्यांनी तुम्हाला मतदान केले, त्या लोकांची तरी कामे का केली नाही? तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असूनही काहीच कामे झाली नाहीत. वर्षांनुवर्षे पदे सत्ता या ना त्या प्रस्थापित पुढाऱ्यांकडे आहेत. मग गोरगरिबांचे रस्त्याचे प्रश्न का मार्गी लागले नाहीत? गावातील भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न, जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही सोडवला का नाही? अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवता आले असते, परंतु अध्यक्षांनी येथील कामाऐवजी कर्जत तालुक्यात स्मशानभूमीची कामे दिली. त्यामुळे यापुढे तुम्ही एकजुटीने जनशक्तीच्या मागे खंबीरपणे उभे राहा. तुमचे प्रश्न सोडविण्याची ताकद आमच्या संघटनेमध्ये आहे. प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून आता तरी बाहेर पडा, असे आवाहन त्यांनी केले.
चालू गळीत हंगामात कारखान्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्रथम गाळप करावा.मगच बाहेरच्या तालुक्यातून ऊस आणावा.गेल्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी तोडणीसाठी पैसे दिले. त्या शेतकऱ्यांनी आमच्या संघटनेकडे नावे द्यावीत तुमचे पैसे वसूल करून देऊ.
- शिवाजीराव काकडे, अध्यक्ष जनशक्ती पक्ष, शेवगाव.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.