काकडे गटाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात; भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीलाही धक्के बसणार

नगरेसवकांचा प्रवेश लगेच होऊ शकणार नसला तरी त्यांचे निकटवर्तीय किंवा पतीपत्नी यांचा प्रवेश करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
BJP-Ncp
BJP-Ncpsarkarnama
Published on
Updated on

पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) खरी लढत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून इतर पक्षातील नगरसेवकांची (Corporator) तसेच तुल्यबळ उमेदवारांना फोडण्यासाठी खलबत सुरू झाली आहेत. नगरेसवकांचा प्रवेश लगेच होऊ शकणार नसला तरी त्यांचे निकटवर्तीय किंवा पतीपत्नी यांचा प्रवेश करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. आरक्षणे जाहीर झाल्यावर पक्षांतरास आणखी वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे.

निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यात मोठ्याप्रमाणात प्रभाग बदलले गेले. बहुतांश नगरसेवकांना ५० टक्के देखील भाग त्यांच्या सोईचा नसल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. महापालिकेत बहुमतासाठी १७३ पैकी ८७ नगरसेवकांचे बळ सोबत असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक, तुल्यबळ उमदेवारांचा दोन्ही पक्षांकडून शोध सुरू झाला आहे.

BJP-Ncp
पुण्यात भाजपला दे धक्का ; नगरसेविका शितल सावंत यांच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश

वडगाव शेरीमध्ये सध्या १४ नगरसेवक हे भाजप व रिपाइ युतीचे आहेत. राष्ट्रवादीने या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, भाजपमध्ये गेलेले नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यापैकी काहींनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. वडगाव शेरीतून आता २७ नगरसेवक निवडून जाणार आहेत. येथे राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपचे सध्याचे सहा नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तर आरक्षणांची सोडत निघाल्यानंतर व स्थानिक समीकरणे लक्षात घेता आणखी दोन ते तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करू शकतात. हा मतदारसंघ भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा असल्याने तेथे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते काय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पर्वती मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार व जवळपास २० नगरसेवकांची फौज आहे. काही नगसेवकांचे प्रभाग सुरक्षीत असले तरी अनेकांचे मतांचे गणित बिघडल्याने ते चिंतेत आहेत. पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या भाजपच्या नगरसेवकांकडे राष्ट्रवादीने चाचपणी सुरू केली आहे. मात्र, हे नगरसेवक पूर्वीपासून भाजपचेच असल्याने राष्ट्रवादीची ही चाल यशस्वी होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पर्वती व खडकवासला मतदारसंघाचा भाग असलेल्या संपूर्ण सिंहगड रस्त्यावर व धायरी, वडगावमध्ये राष्ट्रवादीचा सध्या एकही नगरसेवक नाही. या दोन्ही मतदारसंगातील काकडे गटाच्या नगरसेवकांनी इतर पक्षात चाचपणी सुरू केली आहे. तर या मतदारसंघतील राष्ट्रवादीचा एक ज्येष्ठ नगरसेवक पक्षांतर्गत कुरबुरीला वैतागून भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा आहे.

शिवाजीनगरमध्ये भाजपचे १२ नगरसेवक आहेत, त्यापैकी दोघे राष्ट्रवादीत येऊ शकतात अशी स्थिती आहे. मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी झाल्यास राष्ट्रवादीतील नाराज गट भाजपला मदत करू शकतो. तसेच भाजपने गोखलेनगर व इतर भागातील काही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तुल्यबळ उमेदवारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

BJP-Ncp
राष्ट्रवादीत परत जाणार का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले...

कॅन्टोन्मेंटमधील भाजपच्या चार जणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोथरूडमध्येही भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असली तरी पक्ष सोडून दुसरीकडे जाणाऱ्यांची शक्यता कमी आहे. गेला तरी निवडून येण्याची शक्यता नसल्याने सध्या तरी भाजपला या मतदारसंघात धोका नाही. कसबा विधानसभा मतदारसंघात नव्या रचनेनुसार दोन पूर्ण प्रभाग आहेत. तर उर्वरित चारचा काही भाग दुसऱ्या मतदारसंघात गेला आहे. भाजपला येथे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने डोकेदुखी वाढणार आहे. राष्ट्रवादीला येथे तुल्यबळ उमेदवार नसल्याने नाराजापैकी काहींना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com