Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. मागच्या 24 तासातील घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर चर्चेतील सर्व नावे मागे पडली आणि आज (शुक्रवारी) सकाळी नविद मुश्रीफ यांचे नाव अंतिम झाले.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत सुरुवातीपासूनच गोंधळ उडाला होता. अरुण डोंगळे यांनी राजीनामा देऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवरून प्रयत्न झाले. पण मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या दबावापुढे डोंगळे यांनी नमते घेतले.
डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वानुमते शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अंतिम झाले होते. मात्र गोकुळ दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष असावा असा दबाव पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकला. त्यामुळे मुश्रीफांनी गुरुवारी संध्याकाळीच कोल्हापूर गाठले. आमदार सतेज पाटील, विनय कोरे या नेत्यांशी आणि गोकुळच्या सत्ताधारी संचालकांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या.
या बैठकांमध्ये चुयेकर यांचे नाव मागे पडले. त्यानंतर अजित नरके, अमरीशसिंह घाटगे आणि नविद मुश्रीफ या तिघांची नावे चर्चेत आली. पण नरके आणि घाटगे यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध झाला. शिवाय घाटगे हे विरोधी पॅनल मधून निवडून आल्याने त्यांची अडचण निर्माण झाली. त्यामुळे नविद मुश्रीफ यांचे नाव शिल्लक राहिले.
पण हसन मुश्रीफ हे नविद यांना गोकुळचे अध्यक्ष पद येण्यास सहमत नव्हते. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष पद, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष पद या दोन मोठ्या सहकारी संस्थेचे अध्यक्षपद एकाच घरात नको अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांची होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावानंतर ते मुलाला अध्यक्षपद देण्यास राजी झाल्याची समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.