
Kolhapur News : मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा न दिल्यानंतर गोकुळ दूध संघातील राजकारण तापले होते. मात्र, तीन दिवसांच्या नाट्यमय घडामोडी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या चर्चेनंतर अध्यक्ष अरुण डोंगळे यांची भूमिका मवाळ झाली. गुरुवारी पदाचा राजीनामा डोंगळे यांनी दिल्यानंतर या वादावर पडदा पडला. पण 'गोकुळ'चे (Gokul Dudh Sangh) अध्यक्ष डोंगळे यांनी मीडियाशी संवाद साधताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
राजीनाम्यासंदर्भात गुरुवारी (ता.22) संचालकांची गोकुळ शिरगाव येथे बैठक झाली. त्या बैठकीनंतर अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही संचालकांशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर दोन महिन्यापूर्वी मी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी गेलो होतो. त्यांनी मला राजीनामा देऊ दिला नाही, असा खुलासा करतानाच अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गोकुळमध्ये सुरू असलेल्या 'इनसाईड स्टोरी'ही सांगितली.
दरम्यान, मुंबईतील सह्याद्री येथे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी या संदर्भात कोणाशी बोलावे लागेल असे सांगितले होते. त्यावेळी मी त्यांना मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे बोट दाखवले होते.
मात्र, मुश्रीफ यांनी त्याला अजून दोन महिने अवकाश आहेत, पुढे बघू असे सांगितले होते. असे अरुण डोंगळे यांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी काही संचालक सोबत आपले वैचारिक मतभेद झाले. त्यानंतर आपण मुश्रीफ यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी आपण राजीनामा देतो असे सांगितले होते. पण त्यावेळी मुश्रीफ यांनी दोन महिने थांबा असे ठणकाहून सांगितले होते. त्यामुळे मी राजीनामा दिला नसल्याचं डोंगळे यांनी स्पष्ट केले.
असे अरुण डोंगळे यांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी काही संचालक सोबत आपले वैचारिक मतभेद झाले. त्यानंतर आपण मुश्रीफ यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी आपण राजीनामा देतो असे सांगितले होते. पण त्यावेळी मुश्रीफ यांनी दोन महिने थांबा असे ठणकाहून सांगितले होते. त्यामुळे मी राजीनामा दिला नसल्याचं डोंगळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपण शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत असे डोंगळे यांनी स्वतःहून सांगितले. त्याबाबतची मी माहिती मंत्री मुश्रीफ यांच्याकडे दिले आहे. पण माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या मुलाला जिल्हा परिषदेमधून उमेदवारी देण्याचे सांगितले असल्याचे डोंगळे यांनी स्पष्ट केले.
अखेर अरुण डोंगळे यांनी बंडाची तलवार म्यान करत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता . मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या दबावानंतर डोंगळे यांचे संभाव्य बंड काही दिवसांपूर्वी शमले. डोंगळेंच्या जागी आता ज्या कै.आनंदराव चुयेकर-पाटील यांनी गोकुळ दूधसंघाची स्थापना केली त्यांचे चिरंजीव शशिकांत पाटील-चुयेकर नवे अध्यक्ष होणार आहेत.
मंत्री मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अभिषेक डोंगळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. कौलव गटातून उमेदवारी मिळणार असल्याचेही ठरले असल्याचे सांगितले जाते. शिवाय त्याच्या विजयाची जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांनी घ्यावी असा शब्दही डोंगळे यांनी मुश्रीफ यांच्याकडून घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतरच डोंगळे हे राजीनाम्यासाठी तयार झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.