hasan mushrif |samarjitsinh ghatge  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video : मुश्रीफांची घाटगेंवर जीभ पुन्हा घसरली; "हा राजा कसला? हा तर भिकारी"

Hasan Mushrif Vs Samarjeetsinh Ghatge : कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध समजितसिंह घाटगे असा सामना रंगणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जोर धरला आहे.

Akshay Sabale

मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते, समरजितसिंह घाटगे यांच्यात वितुष्ट कमी होण्याचं नाव घेत नाही. यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह वाक्य उच्चारली होती. आता पुन्हा घाटगे यांच्यावर बोलताना मुश्रीफ यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा पवार ( Ajit Pawar )  यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तसेच, कागलमधून अजितदादा पवार यांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महायुतीतील भाजपमध्ये असलेले समजितसिंह घाटगे नाराज झाले. त्यांनी ‘तुतारी’ हाती घेत मुश्रीफांना ‘टफ फाइट’ देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मुश्रीफ ( Hasan Mushrif ) आणि घाटगे यांच्यातील विस्तव जाता-जात नाही.

आता मुश्रीफ यांनी हा कसला राजा? हा तर भिकारी म्हणत घाटगे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. आता घाटगे काय उत्तर देतात, हे पाहावं लागणार आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

एका मेळाव्याला संबोधित करताना मुश्रीफ यांनी म्हटलं, “हा राजा आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बरीच कामे केली. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निधीसाठी हा माणूस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्येक आठवड्यात जात असे. दलाली करण्याचं काम यांनी केलं. हा राजा आहे की? भिकारी.”

“35 वर्षांपूर्वी मी शरद पवार ( Sharad Pawar ) यांचं नेतृत्त्व स्वीकारलं आहे. शरद पवार आमचे दैवत होते, आहेत आणि राहणार. आम्ही शरद पवार यांना सांगून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनीही संमती दिली. मात्र, शरद पवार यांना आम्ही गुरूदक्षिणा दिली आहे,” असं हसन मुश्रीफ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT