Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुश्रीफांच्या पोस्टरवरुन कोल्हापुरचे राजकारण तापले; वाढदिवसाचा वाद थेट पोलिस स्थानकात

Hasan Mushriff | Raje Samarjeetsinh Ghatge | : पुरावे देऊन देखील पोलिस तक्रार दाखल करत नसल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushreef) यांच्या वाढदिवसादिनीच्या शुभेच्छा पोस्टरवरुन सुरु झालेला वाद आता पोलिस स्थानकापर्यंत पोहचला आहे. आज भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (Raje Samarjeetsinh Ghatge) या प्रकरणी मोर्चा घेवून कागल पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार देत या प्रकरणाची आम्ही योग्य ती चौकशी करुन कारवाई करु असे आश्वासन घाटगे यांना दिले आहे. यावर पुरावे देऊन देखील पोलिस तक्रार दाखल करत नसल्याचा आरोप घाटगे यांनी केला आहे.

यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. तसेच रामनवमीला जन्माला आल्याचा मुश्रीफांचा (Hasan Mushrif) दावाही खोटा आहे. त्यांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमी दिवशी झाला आहे. कारण विकिपीडिया वरती २४ मार्च १९५४ ही तारीख आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला दिलेल्या कागदपत्रांमध्ये देखील हीच जन्मतारीख आहे. पण ते ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी रामनवमी नाही तर रंगपंचमी होती, असं सांगत घाटगे यांनी यावेळी पंचागही दाखवले. त्यामुळे मुश्रीफांनी स्वतःच्या अंगावर खोटे रंग रंगवून घेतले असल्याचा आरोप करत अखंड बहुजन समाजाचा त्यांनी अपमान केला असल्याची भावना व्यक्त केली.

नेमका काय आहे वाद :

रामनवमीदिवशी गोकूळ दूध संघाच्या संचालकांकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लावले होते. मात्र या पोस्टर्सला राम नवमीची डिझाइन करण्यात आली होता. तसेच हसन मुश्रीफ यांच्या नावाला राम या शब्दाची डिझाईन करण्यात आली होती. याच सर्व गोष्टींवर भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी आक्षेप घेत अशा प्रकारे राम या शब्दाची डिझाईन कशी काय करू शकता? तुम्ही रामापेक्षा तुम्ही मोठे आहात का? असा सवाल विचारला. तसेच प्रभु श्रीराम यांचा एकेरी उल्लेख केला असल्याने घाटगे यांनी कागल पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांच्या मोर्चासह हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याचेही स्पष्ट केले होते.

या सगळ्या वादावर उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, मी माझ्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पण अडीच वर्षांपासून गायब असणारे आता झटका आल्याप्रमाणे उठले आहेत. पण ही जाहिरात गोकुळच्या संचालकांनी दिली आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. त्यांनी माझ्याप्रेमापोटी ती जाहिरता दिला आहे. आम्ही शांत आहोत अन्यथा घाटगे हे आमच्या पासंगालाही पुरणार नाहीत. गेल्या ५० वर्षांपासून मी राम नवमीला वाढदिवस साजरा करतोय. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे? असा सवाल करत हे सगळं प्रकरण समरजित घाटगे यांना महागात पडणार असल्याचा इशाराही मुश्रीफ यांनी यावेळी दिला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT