सदावर्तेंना ४ दिवसांची पोलिस कोठडी; दीड वर्षांपूर्वीच्या वक्तव्याची होणार चौकशी

Gunratan Sadavarte | Satara | : पोलिस ठाण्यात आणल्यावर सदावर्ते यांनी हात उंचावून घोषणा दिल्या.
Gunratan Sadavarte
Gunratan Sadavarte Sarkarnama

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanaje Bhosle) व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सातारा सत्र न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चार दिवसांची म्हणजेच १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांना सातारा (Satara) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना याप्रकरणी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या सोमवार (ता. १८) पर्यंत तरी सदावर्ते यांचा साताऱ्यातील मुक्काम वाढला आहे.

सदावर्ते यांना मुंबईतून ताब्यात घेऊन सातारा पोलिस काल सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान, साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांना आणण्यात येणाऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्याचा रस्ता इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. पोलिस ठाण्यात आणल्यावर सदावर्ते यांनी हात उंचावून घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांना शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी सुरू केली. तसेच त्यांची वैद्यकिय तपासणी ही केली. याशिवाय सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई पूर्ण केली.

Gunratan Sadavarte
Silver Oak Attack : ॲड. सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर अटक; ‘ही’ लावली कलमे!

दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सदावर्तेंचा निषेध करण्यात आला. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या बाहेर जमून जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा.., सदावर्ते हाय हाय.. अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे बाबा शिंदे, शरद जाधव, बापू क्षीरसागर, बंटी शिंदे, विवेक कुराडे पाटील, प्रशांत निंबाळकर, संदीप पोळ, अविनाश बाबर, आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

Gunratan Sadavarte
रोहित पवार म्हणाले, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही...

सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी भगवान निंबाळकर म्हणाले, सदावर्ते यांना आम्ही घेऊन आलेले आहोत. सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून त्यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच त्यांची वैद्यकिय तपासणी केली जाणार आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. आमच्याकडे त्यांच्याविरोधात २०२० मधील एकच गुन्हा दाखल आहे. त्यांना अटक करून त्यांची चौकशी करून उद्या (शुक्रवारी) सातारा न्यायालयात दाखल केले जाणार आहे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान सदावर्तेंना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com