Satej Patil, Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif VS Satej Patil : 'त्यांनी रडत बसू नये, त्यांचे शपथ घेतलेले फोटो माझ्याकडे', मंत्री मुश्रीफांचा सतेज पाटलांवर पलटवार

Oath Controversy Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीत त्यांनीही शपथा घेतल्या आहेत. त्यामुळे अशा बतावण्या त्यांनी बंद कराव्यात, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Roshan More

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापले असताना ठराव धारकांवर धार्मिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. कर्नाटकातील एका मंदिरात शपथा सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच शुक्रवारी काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर कडाडून टीका केली होती. त्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आम्ही भाग्यवान आहोत. ठरावधारक महिलांना नवरात्रकाळात आम्ही देव दर्शन दिले आहे. मतदारांना दर्शन घडवले ही भाग्याची गोष्ट आहे. यापूर्वीही अनेक असे प्रयोग झाले आहेत. त्यांनी स्वतः जाऊन अनेक ठिकाणी शपथा घेतल्या आहेत, असा पलटवार काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता केला आहे.

'त्यांनी घेतलेल्या शपथांचे फोटो माझ्याकडे आहेत, मागच्या गोकुळच्या निवडणुकीत त्यांनीही शपथा घेतल्या आहेत. त्यामुळे अशा बतावण्या त्यांनी बंद कराव्यात, आणि परिस्थिला सामोरे जावे. त्यांनी रडत न बसता लढावं.', असा टोलाही सतेज पाटलांना मुश्रीफ यांनी लगावला.

उद्या मतदान

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे मतदान हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होत आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये 35 मतदान केंद्रावर हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात केला असून शस्त्रधारी पोलीस देखील तैनात केले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार असून. मतदान केंद्रावर मतपत्रिका आणि मत पेट्या वितरित केल्या आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT