Gokul Politics : गोकुळ घडामोडीची कुणकुण लागली, दौरे रद्द करत मुश्रीफ, कोरे, कदमांनी विशेष विमानाने मुंबई गाठली!

Mushrif Samit Kadam Vinay Kore : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक विमानाने मुंबई गाठली.
Hasan Mushrif, Samit Kadam and Vinay Kore reach Mumbai by special plane
Hasan Mushrif, Samit Kadam and Vinay Kore reach Mumbai by special planesarkarnama
Published on
Updated on

Gokul News : दिवसेंदिवस गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने महायुतीमध्ये अंतर्गत घडामोडीने वेग घेतला आहे. भाजपकडून जागा वाटपामध्ये इतर घटक पक्षांवर अधिक दबाव वाढतो आहे. त्यातच 'गोकुळ'साठी काही वेगळं शिजत असल्याचे कुणकुण लगताच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांनी विशेष विमानाने मुंबई गाठली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निमित्ताने चर्चा केली असल्याचे समोर येत आहे. रात्री उशिरा तिघेही नेते कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक विमानाने मुंबई गाठली. ‘गोकुळ’ निवडणुकीच्या नियोजनासाठी हा दौरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मंत्री मुश्रीफ यांचे आज आणि उद्या जिल्ह्यातील ठिकाणी दौरे होते. त्यांच्या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रमही शासकीय पातळीवर प्रसिद्ध केला होता.

आमदार कोरे यांचेही आज त्यांच्या मतदारसंघात नियोजित कार्यक्रम होते. मात्र, अचानक दोन्ही नेत्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करून विमानाने मुंबई गाठली. दोघेही सकाळी एकाच विमानातून मुंबईला गेले.

Hasan Mushrif, Samit Kadam and Vinay Kore reach Mumbai by special plane
Gokul election : 'गोकुळ'मध्ये हसन मुश्रीफच 'बाजीगर'; अदृश्य शक्तीला रोखलं, पण खरी परीक्षा तर...

मुख्यमंत्र्यांनी बोलाविल्यामुळे ते अचानक गेल्याची माहिती पुढे आली. मंत्री मुश्रीफ, आमदार कोरे, समित कदम यांच्यासह काही मोजक्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये आज मुंबईत बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. यामध्ये गोकुळच्या निवडणुकीबाबत फिल्डिंग लावल्याचे समजते.

‘गोकुळ’साठी तगडी फिल्डिंग

आज (ता.१९) पासून दोन दिवस मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील घडामोडी होण्यापूर्वीच मुंबईत भेटून गोकुळच्या आजपर्यंतच्या घडामोडीबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्याचे समजते. दरम्यान, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी अचानक मुंबईत आलो आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्यासह समीत कदम आज सकाळी एकाच विमानातून मुंबईला रवाना झाले. रात्री दहाच्या सुमारास ते विशेष विमानातून कोल्हापुरात दाखल झाले. हे विमान तातडीने पुन्हा मुंबईला रवाना झाले. त्यामुळे मंत्री आणि आमदार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ‘गोकुळ’संदर्भात फिल्डिंग लावल्याचे समजते.

Hasan Mushrif, Samit Kadam and Vinay Kore reach Mumbai by special plane
Gokul Dudh Sangh Elections: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार! हसन मुश्रीफांनी थोपटले दंड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com