हसन मुश्रीफ यांनी शिवाजी पाटील यांच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली
100 कोटी रुपयांच्या फौजदारी बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा
गोकुळ प्रकरणावरून कोल्हापुरात राजकीय वाद अधिकच तीव्र
Kolhapur Gokul Politics : आमदार शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमधील साधा "ग" सुद्धा कधी उच्चारलेला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतरच त्यांना हा सगळा साक्षात्कार झालेला दिसतोय. त्यामुळेच अलीकडच्या काळात ते सातत्याने माझ्यावर आरोप करीत सुटले आहेत. मी मात्र पाटील यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे यापूर्वीच सांगितलेले होते आणि बोलणारही नव्हतो. परंतु; काल त्यांनी "हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यावधी रुपये बँकेत आणून बदलून घेतले आणि बँकेला अडचणीत आणले", असा व्यक्तिशः बदनामीकारक आरोप केला. त्यामुळे, मी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मी गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये माझ्या वैयक्तिक प्रतिमेला फार जपत आलो आहे. मी कुठलीही गोष्ट मान्य करेन. परंतु; माझी प्रतिमा, माझा स्वाभिमान, माझ्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन कधीही बदलता कामा नये, यासाठी मी पडेल ती किंमत देऊन मी कायदेशीर लढाई लढत असतो. आजपर्यंत ज्या- ज्या वेळी माझी व्यक्तिशः बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी १०० कोटी रुपयांचे फौजदारी बदनामीकारक दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत. माझ्यावतीने दाखल होत असलेला हा दहावा दावा आहे.
आमदार शिवाजी पाटील यांनी माझ्यावर केलेल्या या वक्तव्यातून त्यांनी माझी व्यक्तीश: बदनामी केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांनी यासंबंधीचे पुरावे जाहीर करावेत. अन्यथा; त्यानंतर त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीकारक दावा दाखल करणार आहे.
आमदार शिवाजी पाटील यांनी असेही वक्तव्य केले आहे की, "केडीसीसी बँकेकडून साखर कारखान्यांसह इतर संस्थांना अर्थपुरवठा केला जातो. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्यास आमदार घाबरतात". त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हासुद्धा आमदारांचा, माझ्या संचालकांचा, कारखानदारांचा आणि समस्त शेतकऱ्यांचाही अपमानच आहे, असाही दावा या पत्रातून मुश्रीफ यांनी केला आहे.
हे करूनच दाखवाच......!
मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, आमदार श्री. पाटील हे गोकुळ दूध संघ आणि के. डी. सी. सी. बँकेत चौकशी लावतो, हे करतो आणि ते करतो, अशा नुसत्या बाष्कळ गप्पा मारत आहेत. त्यांनी ते एकदा करूनच दाखवावच. कारण; आम्ही संस्था कशा स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख चालविलेल्या आहेत, हे सगळ्या सभासदांना आणि जनतेलाही माहीत आहे.
1. हसन मुश्रीफ यांनी काय इशारा दिला आहे
100 कोटींच्या बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे
2. शिवाजी पाटील यांनी कोणता आरोप केला
नोटाबंदीच्या काळात पैशांबाबत आरोप केले
3. हा वाद कोणत्या मुद्द्यावरून सुरू झाला
गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून वाद वाढला
4. हा प्रकरण कुठे घडत आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात हा वाद सुरू आहे
5. पुढे काय होऊ शकते
प्रकरण न्यायालयात जाऊन राजकीय तणाव आणखी वाढू शकतो
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.