Hasan Mushrif : 'आता गोकुळचा गुलाल लावूनच शिवाजी पाटील यांना उत्तरे देईन', मंत्री मुश्रीफांनी 'शड्डू ठोकला'

Hasan Mushrif On Shivaji Patil Over Gokul Political BJP NCP Clash : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून जिल्ह्यातील भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात वाद रंगला आहे.
Gokul Political BJP NCP Clash; Hasan Mushrif, Shivaji Patil
Gokul Political BJP NCP Clash; Hasan Mushrif, Shivaji Patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून कोल्हापुरात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद वाढला आहे.

  • शिवाजी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

  • मुश्रीफ यांनी निकालानंतरच उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये वाद रंगला आहे. चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असताना गोकुळच्या निवडणुकीनंतर यावर बोलण्याचे भाष्य मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. शिवाय आमदार शिवाजी पाटील यांचे आभार देखील मानले आहेत.

गेली 40 वर्षे मला सामाजिक आणि राजकीय अनुभव आहे. सहा वेळा निवडून आलोय, 25 वर्ष मंत्रीपद आहे. राज्यातल्या तमाम कार्यकर्त्यांना हसन मुश्रीफ काय ती माहिती आहे. कोण काय बोलते? त्याकडे लक्ष द्यायला नको. गोकुळचा ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच शिवाजी पाटील यांना उत्तरे देईन, अशीही प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतील, तो मान्य आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

मी शिवाजी पाटील यांचा आभारी आहे की त्यांनी मला रिकामं केलं. बारा हजार वेळा नाहीतर 13 हजार वेळा मी म्हणालो आहे मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मंत्री आहे. पण आता कोण काय बोलतो ते मला माहित नाही. गोकुळच्या प्रश्नावर मी काही आता उत्तर देणार नाही. ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन, असे म्हणत मंत्री मुश्रीफ यांनी शड्डू ठोकला आहे.

Gokul Political BJP NCP Clash; Hasan Mushrif, Shivaji Patil
'आजीतदादाना सांगून नाकारलं असतं, पण Sunetra वहिनींना...' Hasan Mushrif यांचा नाराजीचा सुर।Nandurbar

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो आहोत. अजितदादा यांनी फार मोठा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नाही.आम्ही महायुतीचे घटक आहेत. महायुतीचे घटक म्हणून राहणार आहोत. सुनेत्रा पवार वहिनी या उपमुख्यमंत्री आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद, 42 आमदार, खासदार अशा वेळी चुकीची वक्तव्य करणं योग्य नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

भोर अत्याचार प्रकरणावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी ही घटना गंभीर आहे. 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केलाय त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. कडक कायदे केले पाहिजेत. कायद्यामध्ये फार मोठ्या सुधारणा कराव्या लागतील. ज्यानंतर अशी हिम्मत होणार नाही, अशांना धडा शिकवण्याची गरज असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Gokul Political BJP NCP Clash; Hasan Mushrif, Shivaji Patil
'अजितदादा गेले अन् आम्ही पोरके झालो' मुश्रीफांच वक्तव्य Hasan Mushrif, Sunetra Pawar, Baramati

FAQs :

1. गोकुळ दूध संघावरून वाद का सुरू झाला आहे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे वाद निर्माण झाला आहे

2. या वादात कोणते नेते सहभागी आहेत
शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात मुख्यतः वाद सुरू आहे

3. मुश्रीफ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे
त्यांनी निकाल लागल्यानंतरच सर्व आरोपांना उत्तर देणार असल्याचे सांगितले आहे

4. हा वाद कोणत्या पक्षांमध्ये आहे
महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात हा वाद रंगला आहे

5. याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो
या वादामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो आणि निवडणुकीचे वातावरण अधिक तापू शकते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com