Devendra Fadnavis,Hasan Mushrif, Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांनी सर्व आरोप फेटाळले, शिंदे फडणवीस सरकारला दिलं खुलं आव्हान

Hasan Mushrif ED Raid : आमच्या मुलाबाळांना नाहक त्रास देणं योग्य नाही...

सरकारनामा ब्यूरो

Hasan Mushrif ED Raid News : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या पुणे, कागल निवासस्थानी ही छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना घोटाळा आरोप प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

याचवेळी मुश्रीफांचे व्यावसायिक भागीदार व ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावरही ईडीने छापा टाकला आहे. आता हसन मुश्रीफांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले असून शिंदे फडणवीस सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ब्रिस्क कंपनी आणि तिचे संचालक चंद्रकात गायकवाडांशी माझा काहीही संबंध नाही. काही चौकशी करायची असेल तर तपास यंत्रणांनी आम्हांला नोटीस पाठवावी, कार्यालयात बोलवावं पण आमच्या मुलाबाळांना नाहक त्रास देणं योग्य नाही.

ईडीच्या छापेमारीचं कारण माहीत नाही. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याशी माझा संबंध नाही असं म्हणत हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी त्यांच्यावरचे सर्व आऱोप फेटाळले आहेत.

याचवेळी माझ्या जावयाचा व ब्रिस्क कंपनीचा देखील काहीही संबंध नाही. हे माझ्या जावयावरील सर्व आरोप खोटे आहे अशी भूमिका देखील मुश्रीफांनी मांडली. शेतकर्यांच्या पैशातूनच कारखान्याची उभारणी करण्यात आली. आता सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना ब्रिस्क कंपनी चालवत नाही असेही मुश्रीफ म्हणाले.

यापूर्वीच्या छापेमारीतून काहीही निष्पन्न झालेलं नाही. किरीट सोमय्यांनी जुनेच आरोप नव्यानं केले आहेत. त्याचवेळी सोमय्यांच्या आरोपांना तीन पत्रकार परिषदा घेऊन उत्तर दिले आहेत. आता सरकार त्यांचं आहे. त्यांनी बिनधास्त चौकशी करावी असं आव्हान देतानाच ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT