पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; मुरगुडचा एकजण पोलिसांच्या ताब्यात

Social Media Crime : संशयित आरोपीने यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप

Rahul Gadkar

Kolhapur Crime News :

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. याची मुरगुड पोलिसांनी याची तात्काळ दखल घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एकाला ताब्यात घेतले.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर तणाव निर्माण होऊ लागला होता. यापूर्वीही तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसवरून अनेक जिल्ह्यातं प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

त्यामुळे मुश्रीफ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होताच मुरगुड पोलिसांनी तातडाने कारवाई करत एकावर गुन्ह्याची नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे. कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथील अनिल रामचंद्र काळगे संशयिताला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

अनिल काळगे याने बुधवारी दुपारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. अनिल काळगे वारंवार सोशल मीडियावर (Social Media) अशा पोस्ट करत तणावाचे वातावरण निर्माण करत असतो. काल त्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल पोस्ट व्हायरल केली. ही बाब कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. आता अनिलवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याबाबतची तक्रार कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर यांनी मुरगुड पोलिसांत तक्रार दिली.

मुश्रीफांबाबतचा दुसरी घटना

पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट सुरू केल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. ही बाब गंभीर असल्याने या विरोधात मुश्रीफ यांच्याय कार्यकर्त्यांनी कागल पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

या घटनेला महिना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे हे सर्व जाणूनबुजून केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT