Hasan Mushrif News : ...अन् हसन मुश्रीफ अजित पवारांसमोरच भर मेळाव्यात रडले!

Ajit Pawar NCP News : जाणून घ्या, नेमकं काय कारण होतं आणि कुठे घडला हा प्रसंग?
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur District Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील मौजे सांगाव येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात एक भावनिक घटना घडल्याचे समोर आले. मेळाव्यासाठी मोठ्यासंख्येने आलेले शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांसमोरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी जुन्या गोष्टींना उजाळा देताना मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासाचे वर्णन केले. हाच धागा पकडून बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांना व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच अश्रू अनावर झाले.

हसन मुश्रीफ हे गेली सहा टर्म कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मेळाव्यात जनता आणि मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्यातील ऋणानुबंध सांगताना मुश्रीफ यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'तुमच्याच ताकदीवर अनेक संकट पेलून मी उभा आहे. या जनतेचा मी आभारी आहे. राजकीय जीवनात दोन मोठी संकट माझ्यावर आली. या काळात ही जनताच माझ्यासोबत राहिली.' असे सांगताच पालकमंत्री मुश्रीफ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच अश्रू अनावर झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif
Hasan Mushrif News : संजीव ठाकूर प्रकरण तापलं; धंगेकर अन् मुश्रीफांमध्ये जुंपली

माजी आमदार के.पी.पाटील यांनी भाषण करताना 'मुश्रीफ यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होत असताना अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत उभे राहिले.' असे सांगितले आणि युवराज बापू, भैय्या माने, फराकटे या काही नावांचा उल्लेख केला. शिवाय यांनी मुश्रीफ यांना पडत्या काळात राजकीय ताकद देण्याचे काम केल्याचे सांगत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावर मुश्रीफ यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू आवरता आले नाही.

याप्रसंगी मुश्रीफ म्हणाले, 'अजित दादांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. अचानक एक राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदार संघातील जनतेनं मला समजून घेतलं. आजपर्यंत अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी मिळाली. पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं, ती सुधा संधी अजितदादांनी(Ajit Pawar) दिली. मी शब्द देतो महायुतीमधील एकाही पक्षाची माझ्याबद्दल तक्रार येणार नाही.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Hasan Mushrif
Solapur Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीत सग्या-सोयऱ्यांचाच भरणा...पंढरपुरात पवारांचे निष्ठावंत दूर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com