Kolhapur Crime News : बीड जिल्ह्यातील घटना ताजी असताना कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका शिक्षकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथे शिक्षकाचे विद्यार्थ्यांनींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण प्रसारक मंडळातील शाळेच्या निसार मुल्ला या शिक्षकाने मुलींशी गैरवर्तन केल्याने संबंधित शिक्षकाला जमावाने चोप दिला. पीडित मुलींनी घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या शिक्षकावर कारवाई करण्याच्या सूचना तत्काळ दिल्या आहेत.
सेनापती कापसीतील एका शिक्षण प्रसारक मंडळातील शाळेतील शिक्षकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटनेनंतर मुलीने आई वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांसह आई-वडील शाळेत येऊन शिक्षकाला जाब विचारला.
त्यावेळी संतप्त झालेल्या पालक आणि जमावाने शिक्षकाला वर्गातून बाहेर खेचून मारहाण केली. संपूर्ण प्रकारानंतर शाळेसमोर गर्दी झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच संबंधित शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क करून, संबंधित शिक्षकाला तात्काळ अटक करा, अशा ***खोर शिक्षकावर तात्काळ कारवाई करा, अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, त्या शिक्षण प्रसारक मंडळाकडून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. शिक्षकाला कायमस्वरूपी निलंबन करत त्याच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. बाबतची प्रेस नोट त्यांनी माध्यमांना दिली आहे. यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात संतप्त भावना व्यक्त होताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.