Hasan Mushrif News: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद; संतापलेल्या मुश्रीफांनी 'केडीसीसी' बँकेतूनच दिले मोठे आदेश

Kolhapur NCP Politics: एकदिलाने पालिकेची निवडणूक लढविण्याचा आदेश देत माजी उपनगराध्यक्ष किरण कदम व माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे हे दोघेही यापुढे नेतृत्व करतील, अशी घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाराजी लक्षात घेऊन संतापलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत बोलावून घेऊन पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. जुन्या-नव्या प्रमुख कार्यकर्त्यांत झालेल्या दुराव्यावर मंत्री मुश्रीफ यांनी झापल्यानंतर दिलजमाईचा नारा घुमला. एकदिलाने पालिकेची निवडणूक लढविण्याचा आदेश देत माजी उपनगराध्यक्ष किरण कदम व माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे हे दोघेही यापुढे नेतृत्व करतील, अशी घोषणा हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली.

वर्षभरापूर्वी जनता दलातून खणगावे व नरेंद्र भद्रापूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, पक्षात नव्याने आलेल्या आणि जुन्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्‍ये‍ अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या. हा वाद कमी होण्याऐवजी वाढतच राहिला.

परिणामी, जुन्या व नव्यामध्ये दुरावा वाढत गेला. ही अंतर्गत सुरू असलेली धुसफूस मुश्रीफ यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे कालच त्यांनी खणगावे व भद्रापूर यांना कापशीमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांची समजूत काढून आठवड्यात गडहिंग्लजमध्ये समोरासमोर बसून गैरसमज दूर करण्याची ग्वाही दिली होती.

दरम्यान, या घडामोडीला आणखीन फाटे फुटू नयेत, याची काळजी घेत आजच यावर पडदा टाकण्याचे ठरवून मुश्रीफ यांनी सायंकाळी शहरातील राष्ट्रवादीतील (NCP) जुन्या व नव्या प्रमुखांना कोल्हापुरात केडीसीसी बँकेत पाचारण केले. त्यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेत जुन्या व नव्या प्रमुखांतील झालेले गैरसमज मुश्रीफ यांनी दूर केल्याचे सांगण्यात आले. 

Hasan Mushrif
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : '...अन् शत्रू बेसावध राहिला, मग घरात घुसून पराभव केला'; सुजय विखेंनी थोरातांच्या पराभवामागील रणनीती सांगितली

तसेच शहरात कदम व खणगावे दोघे मिळून सर्वांना सोबत घेऊन जातील. दर पंधरा दिवसांतून पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होईल. कोणावरही पक्षात अन्याय होणार नाही, असे कामकाज सर्वांनी करावे.

आगामी पालिकेची निवडणूक एकदिलाने सर्वांनी लढवावी, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्‍यात आले. यावेळी शहरातील माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com